Yavatmal: राळेगावात आढळला परप्रांतीय तरुणाचा मृतदेह
By विलास गावंडे | Updated: March 25, 2024 20:27 IST2024-03-25T20:27:37+5:302024-03-25T20:27:54+5:30
Yavatmal News: सोमवारी दुपारी राळेगाव येथील एका पडक्या इमारतीजवळ परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. २४ वर्षीय या तरुणाचे नाव अर्जुन असल्याची माहिती मिळाली.

Yavatmal: राळेगावात आढळला परप्रांतीय तरुणाचा मृतदेह
- विलास गावंडे
राळेगाव (यवतमाळ) - सोमवारी दुपारी राळेगाव येथील एका पडक्या इमारतीजवळ परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. २४ वर्षीय या तरुणाचे नाव अर्जुन असल्याची माहिती मिळाली.
अर्जुन हा येथील एका चायनीज सेंटरवर काम करत होता. येथील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्धवट सभागृहाच्या भिंतीला लागून त्याचा मृतदेह आढळला. या इमारतीकडे लघुशंकेला गेलेल्या व्यक्तीला हा प्रकार दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आला. माहिती मिळताच राळेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा आढळून आल्या. त्याला दगडाने ठेचून ठार मारले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा तरुण कोणत्या चायनीज सेंटरवर काम करत होता, केव्हापासून कामावर आला नाही याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.