यवतमाळ जिल्ह्यात १८१ जण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:16 PM2020-09-07T21:16:59+5:302020-09-07T21:17:33+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 181 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 139 नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

In Yavatmal district, 181 people were released from corona and one died | यवतमाळ जिल्ह्यात १८१ जण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात १८१ जण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे139 नव्याने पॉझेटिव्ह



लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 181 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 139 नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

मृत झालेला व्यक्ती हा पुसद शहरातील 42 वर्षीय पुरुष आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 139 जणांमध्ये 83 पुरुष 56 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 15 पुरुष व 13 महिला, यवतमाळ तालुक्यातील चार पुरुष, नेर शहरातील एक पुरुष, वणी शहरातील 18 पुरूष व 13 महिला, पुसद शहरातील 15 पुरूष व 16 महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरूष व दोन महिला, महागाव शहरातील दोन पुरूष, महागाव तालुक्यातील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील सात पुरूष व दोन महिला, घाटंजी शहरातील पाच पुरूष व तीन महिला, दिग्रस शहरातील सात पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील एक महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरूष व एक महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील चार पुरूष व चार महिलांचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 766  पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 306 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4392 झाली आहे. यापैकी 3140 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 119 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 206 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 155 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 56472 नमुने पाठविले असून यापैकी 53020 प्राप्त तर 3452 अप्राप्त आहेत. तसेच 48628 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: In Yavatmal district, 181 people were released from corona and one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.