यवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह, 59 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:08 PM2021-02-02T21:08:08+5:302021-02-02T21:08:30+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 338 रिपोर्ट प्राप्त झाले.

In Yavatmal district, 44 people tested positive and 59 coronal free | यवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह, 59 कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह, 59 कोरोनामुक्त

Next

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 59 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच माहूर (जि. नांदेड) येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झाला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 338 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 294 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 479 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14510 झाली आहे. 24 तासात 59 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13604 आहे. तर जिल्ह्यात एकूण 427 मृत्युची नोंद आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत 143487 नमुने पाठविले असून यापैकी 143192 प्राप्त तर 295 अप्राप्त आहेत. तसेच 128682 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: In Yavatmal district, 44 people tested positive and 59 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.