...अन् संतप्त शेतकऱ्याने सोयाबीन जाळले; सरकारच्या भोंगळ कारभाराचा बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 07:33 AM2020-10-28T07:33:14+5:302020-10-28T07:52:46+5:30
Agriculture farmer Yawatmal News निसर्गाने मारले अन् प्रशासनाने अव्हेरले... अशा कात्रीत अडकलेल्या एका शेतकऱ्याने चक्क सोयाबीन जाळून आपला संताप व्यक्त केला. मनिष जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
यवतमाळ : निसर्गाने मारले अन् प्रशासनाने अव्हेरले... अशा कात्रीत अडकलेल्या एका शेतकऱ्याने चक्क सोयाबीन जाळून आपला संताप व्यक्त केला. मनिष जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे. सुरवातीला दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. कशीबशी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली. शेतकऱ्यांना पदरी दोन पैसे पडतील, अशी आशाही निर्माण झाले होती. पण परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले. उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव. पावसाने उसंत घेतल्याने त्यांनी सोयाबीन सोंगणीस सुरवात केली. सोयाबीनच्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे. सरकारी निकष बदलून शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे गरजेचे आहे.
संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सरकारचा निषेध करत शेतातील सोयाबीन पेटवून दिले, यवतमाळ येथील घटना #farmers@CMOMaharashtrapic.twitter.com/gVb1WPau3l
— Lokmat (@MiLOKMAT) October 28, 2020