यवतमाळ जिल्ह्यात सापाला मारण्यासाठी लावली चक्क झाडाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:30 AM2020-12-16T11:30:12+5:302020-12-16T11:30:35+5:30
yawatmal news snake साप वाळलेल्या कडू लिंबाच्या झाडाच्या पोकळीत साप शिरला म्हणून चक्क झाड पेटवल्याचा अजब प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : साप वाळलेल्या कडू लिंबाच्या झाडाच्या पोकळीत साप शिरला म्हणून चक्क झाड पेटवल्याचा अजब प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडला आहे. कळंब येथे एक बिनविषारी साप कडू लिंबाच्या पोकळीत शिरला. एका नागरिकाने ही घटना बघितली. त्याने या सापाला बाहेर काढण्यासाठी चिंधीला आग लावून झाडाच्या पोकळीत टाकली. बघता बघता झाडाने पेट घेतला. हे झाड नागरी वस्तीत असल्याने नागरिकात घबराट पसरली. या वेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. महत प्रयासाने ही आग विझविण्यात आली. पण सुदैवाने या सापाला कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. फायर ब्रिगेडच्या लोकांनी या सापाला वाचविले. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय यावेळी आला.