यवतमाळ जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 06:58 PM2020-07-16T18:58:32+5:302020-07-16T19:00:01+5:30
यवतमाळ येथील श्रेया संजय बाजोरिया या विद्यार्थिनीने ९५.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के लागला. यंदा ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
यवतमाळ येथील श्रेया संजय बाजोरिया या विद्यार्थिनीने ९५.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. ती जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील मूळ रहिवासी आहे. तर याच शाळेच्या साक्षी हरीश जाधवाणी या विद्यार्थिनीने ९४.१५ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतून पहिला क्रमांक पटकाविला आहे. अभ्यंकर कन्या शाळेची प्रगती सुखदेव भरणे ही विद्यार्थिनी ८९.३८ टक्के गुणांसह कला शाखेतून पहिली ठरली आहे.
जिल्ह्याचा निकाल सुधारला
मागील वर्षीपेक्षा यंदा यवतमाळ जिल्ह्याचा निकाल सुधारला आहे. गेल्या वर्षी केवळ ८६ टक्के निकालासह यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात ढांग होता. यंदा ९१.८५ पर्यंत निकालाची टक्केवारी वाढली असून विभागातील पाच जिल्ह्यात यवतमाळ तिसºया क्रमांकावर पोहोचला आहे.
जिल्ह्यात महागाव टॉप तर मारेगाव ढांग
यंदा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. तालुकानिहाय टक्केवारी पाहता महागाव तालुक्याने ९६.१९ टक्के निकालासह जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. तर मारेगाव तालुका ७९.६६ टक्के निकाल घेऊन जिल्ह्यात ढांग ठरला आहे.