यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 01:34 PM2020-05-20T13:34:55+5:302020-05-20T13:36:15+5:30

नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग शोधला.

Yavatmal district yields turmeric worth Rs 15 lakh per acre | यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न

यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न

googlenewsNext
ठळक मुद्देनीलेश डहाकेची यशोगाथा, पारंपरिक पिकांना पर्यायचिखली येथील युवा शेतकरी

मुकेश इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग शोधला.
नीलेश जयविजय डहाके रा.चिखली (रामनाथ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. लहानपणापासून त्याला शेतीची आवड आहे. त्यामुळे नोकरी किंवा इतर व्यवसायाच्या मागे न लागता शेतीत करीअर करण्याचे त्याने ठरविले. योग्य पिकांची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनतीच्या बळावर त्याने घाट्याचा व्यवसाय समजल्या जाणाऱ्या शेतीत प्रगती केली आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न चांगले होईल अशा पिकाची त्याने निवड केली. गेल्या दोन वर्षापासून तो हळदीचे पीक घेत आहे. पहिल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात लागवड केली. गावातील शेतकरी रघुनाथ डहाके यांचे कडून ३६ हजार रुपयांचे बेणे विकत घेतले. पहिल्या वर्षी दोन एकरामध्ये ३०० क्विंटल उत्पन्न झाले. पहिल्याच वर्षी उत्पन्न चांगले झाल्याने उत्साह वाढला. त्यामुळे तीन एकरात हळदीची लागवड केली. घरचे बेणे असल्याने खर्च वाचला. वाही, बेड तयार करणे सिंचन, रासायनिक खते, मायक्रोन्युट्रनचे डोज, निंदन, आंतरमशागत याचे योग्य नियोजन केले. तीन एकरात ६०० क्विंटल उत्पन्न झाले. त्यामधील साडेतीन लाखाची १६० क्विंटल हळद बेणेकरीता विकली. इतर बॉयलरच्या सहाय्याने उकडण्यात आली. सुकलेली हळद १५० क्विंटल आहे. यावर्षी सध्या हळदीचे आठ हजार रुपये क्विंटलचे भाव आहे. त्यामुळे आजच्या बाजार भावाप्रमाणे १२ लाखाची हळद त्याच्याकडे आहे. योग्य भाव मिळताच विक्री करण्याचे ठरविले असल्याचे त्याने सांगितले. आजचा जरी हीशोब लावला तरी तीन एकरात १५ लाखाच्या वर उत्पन्न झाले आहे. शेतीव्यवसायात चांगले उत्पन्न घेऊन नीलेश डहाकेने आजच्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.


वडिलांचा अनुभव भावाचे मार्गदर्शन
आपल्या या यशस्वी प्रयोगासाठी वडील जयविजय डहाके यांच्या शेतीतील अनुभवातून बरेच काही शिकता आले. तर थोरला भाऊ शैलेश डहाके यांचे पिकाची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतचे मार्गदर्शन कामी आल्याचे नीलेशने सांगितले.

Web Title: Yavatmal district yields turmeric worth Rs 15 lakh per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती