नांगरणीसाठी पैसे नसल्याने विधवेने घेतले जाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:35 AM2018-05-10T04:35:48+5:302018-05-10T04:35:48+5:30
कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत संघर्ष करणा-या या महिलेने नांगरणीसाठी पाच हजार रुपये न मिळाल्याने हताश होऊन जाळून घेऊन आत्महत्या केली.
यवतमाळ - कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत संघर्ष करणा-या या महिलेने नांगरणीसाठी पाच हजार रुपये न मिळाल्याने हताश होऊन जाळून घेऊन आत्महत्या केली.
सुंदरीबाई चिंतामण चव्हाण (६५) रा. लाडखेड ता. दारव्हा असे या महिलेचे नाव आहे. शेतकºयांच्या आंदोलनात सुंदरीबाई हिरीहिरीने भाग घ्यायच्या. गतवर्षी जून महिन्यात यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत सर्वात पुढे राहून सुंदरीबाईने तिरडीला खांदा दिला होता.
अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले
नांगरणी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला. ज्या शेतीच्या भरवश्यावर आपण आयुष्य काढले तीच यंदा पडिक ठेवण्याची वेळ आल्याने ती नैराश्यात गेली. याच नैराश्यातून २ मे रोजी लाडखेड येथे तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.
जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडनमध्ये
यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन हे गाव शेतकरी आत्महत्यांसाठी क्रुप्रसिद्ध. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडनमध्येच झाल्या. जागतिक माध्यमांनीही या गावाची दखल घेतली. शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, श्रीश्री रविशंकर, मणीशंकर अय्यर यांच्यासह अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या.