Yavatmal: मुलीच्या साक्षगंधापूर्वीच वडिलाची आत्महत्या
By विलास गावंडे | Updated: March 20, 2024 21:32 IST2024-03-20T21:32:24+5:302024-03-20T21:32:58+5:30
Yavatmal News: मुलीच्या साक्षगंधाच्या आदल्या दिवशीच वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी, सकाळी पाच वाजेच्या सुमारास झाडकिन्ही येथे उघडकीस आली.

Yavatmal: मुलीच्या साक्षगंधापूर्वीच वडिलाची आत्महत्या
- विलास गावंडे
डोंगरखर्डा (यवतमाळ) : मुलीच्या साक्षगंधाच्या आदल्या दिवशीच वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी, सकाळी पाच वाजेच्या सुमारास झाडकिन्ही येथे उघडकीस आली.
प्रदीप हिरामण मानकर (५०), असे मृताचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे ते त्रस्त हाेते. मुलीच्या साक्षगंधासाठी आर्थिक तजवीज हाेत नसल्याने विवंचनेत हाेते. अशातच टाेकाचा निर्णय घेत राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपविली. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह बघून पत्नी जया हादरून गेल्या. प्रदीप मानकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी व आई, असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी विजय लोखंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.