समतापर्व प्रतिष्ठानतर्फे ‘यवतमाळ फेस्टीवल’

By admin | Published: September 23, 2016 02:42 AM2016-09-23T02:42:56+5:302016-09-23T02:42:56+5:30

समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळच्यावतीने ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत ‘यवतमाळ फेस्टीवल’ आयोजित करण्यात आला आहे.

'Yavatmal Festival' by Samata Parva Pratishthan | समतापर्व प्रतिष्ठानतर्फे ‘यवतमाळ फेस्टीवल’

समतापर्व प्रतिष्ठानतर्फे ‘यवतमाळ फेस्टीवल’

Next

विविध कार्यक्रमांची रेलचेल : अध्यक्ष ममता महाडोळे, सचिव स्मिता उके
यवतमाळ : समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळच्यावतीने ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत ‘यवतमाळ फेस्टीवल’ आयोजित करण्यात आला आहे. निखळ मनोरंजन, सर्व समावेशक अशा या कार्यक्रमासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ममता महाडोळे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली.
गतवर्षी सुनीता काळे यांच्या अध्यक्षतेत सुपर सिंगर, मिस यवतमाळ, आॅर्केस्ट्रा घेण्यात आला. याहीवर्षी या फेस्टीवलमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. समता पर्व-२०१६ चे अध्यक्ष अशोक वानखडे यांच्या अध्यक्षतेत आणि अभियंता दीपक नगराळे, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, किशोर भगत आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत पदाधिकारी निवडण्यात आले. उपाध्यक्षपदी माधुरी अनिल आडे, नलिनी बाळकृष्ण सरकटे, सचिव स्मिता उके, सहसचिव अर्चना खरतडे, समन्वयक माया गोबरे, सारा हुसेन, स्नेहा डोंगरे, प्रवक्ता जयसिंग भगत, पुष्पमाला वानखडे, प्रसिद्धी प्रमुख बबीता बुरबुरे यांची नियुक्ती झाली आहे.
यावेळी संयोजन समितीचेही पदाधिकारी निवडण्यात आले. यात मंगला दिघाडे, सुनीता काळे, उज्ज्वला इंगोले, राखी भगत, रविता भोवते, डॉ. स्मिता गवई, प्रिया वाकडे, स्नेहल नगराळे, प्रमोदिनी रामटेके, माधुरी फेंडर, डॉ. लीना बन्सोड, कमलाताई खंडारे, लीलाताई भेले, प्रज्ञा नरवाडे, बीना भगत, अर्विता वाढवे, कोकिळा भगत यांचा समावेश आहे. प्रास्ताविक प्रा. अंकुश वाकडे, संचालन नारायण थूल यांनी केले. सभेला मधुकर भैसारे, जनार्धन मनवर, जगदीश भगत, राहुल कोचे, अरुण कांबळे, सुभाष डोंगरे, सिद्धार्थ भवरे, नारायण थूल, के.एस. नाईक, खुशाल भगत, विनोद बुरबुरे, हरिदास भगत, रवी श्रीरामे, उत्तम भवरे, डॉ. सुभाष जमदाडे, प्रवीण पाईकराव, विष्णू भितकर, बाळकृष्ण सरकटे, धीरज वाणी, दिनेश भगत, गुड्डू मीर, विजय रंगारी, संतोष राऊत, तरुलता कांबळे, सुभाष कुळसंगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Yavatmal Festival' by Samata Parva Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.