मारेगावलगत धावत्या कंटेनरला आग; शेतकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:33 PM2020-05-08T13:33:33+5:302020-05-08T13:33:42+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र.एम एच ३४ बीजी ९७७७) हा चंद्रपूरकडून यवतमाळकडे जात असताना मारेगावपासून ६ किमी अंतरावर त्याला आग लागली.
वणी(यवतमाळ): मारेगांव वणी हायवेवर शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता चालत्या सिमेंट कंटेनरला शार्ट सर्किटने आग लागली, शेजारील शेतकऱ्यांनी मोटारपंप सुरू करून आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र.एम एच ३४ बीजी ९७७७) हा चंद्रपूरकडून यवतमाळकडे जात असताना मारेगावपासून ६ किमी अंतरावर त्याला आग लागली.
गौराळा स्टॉपवर चालत्या कन्टेनरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची माहिती कन्टेनर चालक मंगल सोनटक्के यांनी दिली. घटनास्थळाजवळील शेतकऱ्यांनी जळत्या कन्टेनरचे आगीचे लोळ दिसताच आपल्या शेतातील बोर सुरू करून ट्रकपर्यंत पाईपलाईन जोडून तातडीने आग आटोक्यात आणली. यावेळी रस्त्याने प्रवास करणारे दुचाकी चालक अनिल कणगाले, संदीप जुनगरी, फैजाण शेख, सुरेश कोडापे यांनी आग विझवण्यास मदत केली, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनरचा मागचा भाग जळाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.