यवतमाळ गारठले, पारा नऊ अंशावर

By admin | Published: December 26, 2015 02:33 AM2015-12-26T02:33:42+5:302015-12-26T02:33:42+5:30

अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण निर्माण झाले होते.

Yavatmal Garthale, Mercury on 9th Dimension | यवतमाळ गारठले, पारा नऊ अंशावर

यवतमाळ गारठले, पारा नऊ अंशावर

Next

दिवसभर हुडहुडी : ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या, उबदार कपड्यांचा आधार
यवतमाळ : अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनाच थंडीची प्रतीक्षा असताना दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला. एकदम आलेल्या थंडीच्या या लाटेने सर्वांनाच हुडहुडी भरली. शुक्रवारी पारा नऊ अंशांपर्यंत खाली घसरला. ठिकठिणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला.
२४ डिसेंबरच्या रात्रीपासूनच जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. दिवसाच्या तापमानात मोठी घट झाली. यावर्षीच्या तापमानातील ही सर्वात मोठी घट आहे. यामुळे दिवसभर नागरिक उबदार कपडे घालून वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चहा टपऱ्यांमध्ये नागरिकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. दिवसाचे तापमान २३.६ अंश सेल्सियसपर्यंत राहीले. थंडीच्या लाटेचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. ही थंडीची लाट किती दिवस कायम राहते, यावर रब्बीच्या पिकांचे उत्पादन अवलंबून राहणार आहे. वाढलेल्या थंडीने उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेवरील दुकानामध्ये यामुळे सर्वाधिक गर्दी होती. (शहर वार्ताहर)

Web Title: Yavatmal Garthale, Mercury on 9th Dimension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.