विदर्भात यवतमाळचे तापमान सर्वाधिक; पारा ४५.५ अंशापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:18 PM2022-05-16T22:18:12+5:302022-05-16T22:18:45+5:30
Yawatmal News सोमवारी यवतमाळात विदर्भातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. या ठिकाणी सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आलेे.
यवतमाळ : विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. सोमवारी यवतमाळात विदर्भातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. या ठिकाणी सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आलेे.
सलग आठ दिवसांपासून सूर्य आग ओेकत आहे. संपूर्ण विदर्भाचा पारा वाढला आहे. सोमवारी यवतमाळमध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. यापूर्वी शनिवारी ४५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. साेमवारी हे तापमान ४५. ५ अंशावर पोहोचले. वाढलेल्या तापमानाने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यातून जनजीवन प्रभावित झाले आहे. सोमवारी अकोल्यात ४४.१, अमरावती ४३.६, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४१.३, चंद्रपूर ३९.८, गडचिरोली ४१.४, गोंदिया ४०, नागपूर ३९.४, वर्धा ४३.२ वाशिम ४३.३ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले आहे.