यवतमाळच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 09:49 PM2018-02-19T21:49:41+5:302018-02-19T21:50:00+5:30
शहरातील समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडण्यात आल्या. नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील भाजपाची सत्ता असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरातील समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडण्यात आल्या. नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील भाजपाची सत्ता असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात यवतमाळातून भाजपाचे गटनेते विजय खडसे व बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती यांनी प्रतिनिधित्व केले.
शहराला अमृत योजनेतून ३०६ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. आता मुलभूत व पायाभूत सुविधेसाठी ३३७ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा शासनस्तरावर प्रलंबित आहे. याशिवाय शहरातील १३ हजार ५७९ घरकूल लाभार्थ्यांची यादीसुद्धा शासनस्तरावर प्रलंबित आहे. नगरपरिषदेत नव्याने समाविष्ठ झालेल्या २१९ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा प्रस्तावही शासनस्तरावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या मागण्या मंजूर कराव्या असेही साकडे मुख्यमंत्र्यांना घातले. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती यांच्याकडून कळविण्यात आले.