यवतमाळ पोलिसातील शीघ्र कृती दलाच्या वाहनाला अपघात; उपनिरीक्षकासह सात जखमी

By सुरेंद्र राऊत | Published: September 28, 2024 09:01 AM2024-09-28T09:01:03+5:302024-09-28T09:01:13+5:30

उमरखेड येथे बंदोबस्ताला जात होते, पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्याची ही दुसरी घटना आहे 

Yavatmal Police Rapid Action Force Vehicle Accident; Seven injured, including a sub-inspector | यवतमाळ पोलिसातील शीघ्र कृती दलाच्या वाहनाला अपघात; उपनिरीक्षकासह सात जखमी

यवतमाळ पोलिसातील शीघ्र कृती दलाच्या वाहनाला अपघात; उपनिरीक्षकासह सात जखमी

यवतमाळ -  उमरखेड शनिवारी २८ सप्टेंबर रोजी येथे इद ए मिलाद ची मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता जिल्हा पोलीस दलातील शीघ्र कृती दलाचे पथक यवतमाळ वरून स्कार्पिओने उमरखेड जात असताना हिवरा संगम नजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात पोलीस उपनिरीक्षकासह सात कर्मचारी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने मदत पोहोचविली जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस मुख्यालयातील वाहन उमरखेड कडे जात असताना हिवरा संगम गावाजवळ अचानक वाहन अनियंत्रित झाले. यात पोलीस उपनिरीक्षक संजय धावणे (५६), अतुल नगमोते (३०), राहुल एकनाथ (२७), अंकित मनावर (२६), आकाश जाधव (२३),आकाश काळे (३४) यांच्यासह सात जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी व्हीआयपी च्या वाहनाला पायलेटीग करणाऱ्या पोलिस वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला होता.

Web Title: Yavatmal Police Rapid Action Force Vehicle Accident; Seven injured, including a sub-inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात