Yavatmal: वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला अटक, साडेसहा कोटींच्या कामात अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:45 PM2023-03-28T20:45:05+5:302023-03-28T20:45:24+5:30

Yavatmal: यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला.

Yavatmal: Power distribution executive engineer arrested, six and a half crore irregularities in work | Yavatmal: वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला अटक, साडेसहा कोटींच्या कामात अनियमितता

Yavatmal: वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला अटक, साडेसहा कोटींच्या कामात अनियमितता

googlenewsNext

यवतमाळ - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला. या प्रकरणात कंत्राटदार व वीज वितरणचे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाशी थेट संबंध असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी अटक केली.

संजय चितळे यांना गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेच्या कामावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यातच या योजनेवर वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरणाकडून ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरचे काम करण्यात आले. सहा कोटी ५४ लाखांच्या या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. माहिती अधिकारातून अजिंक्य पाटील यांनी हा अपहार बाहेर काढला. या प्रकरणात पात्रता नसणाऱ्या कंत्राटदारांना काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. हा अपहाराचा मुद्दा थेट विधिमंडळात गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कारवाईबाबत विचारणा केली. त्यानंतर, या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली.

न्यायालयाच्या आदेशाने झाला होता गुन्हा दाखल
विधिमंडळापूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांचा दोष असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यावरूनच कंत्राटदार अतुल आसरकर, प्रमोद डोंबळे, विजय दंडे यांच्यावरही कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७७, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सुनील पाटील, मिलिंद गोफणे, दीपक आसरकर यांनी कार्यकारी अभियंत्याला अटक केली. न्यायालयापुढे हजर केले. अटक झालेले कार्यकारी अभियंता संजय चितळे हे सध्या हिंगोली येथे कार्यरत आहे. तेथे दोन उपविभागांचा प्रभार त्यांच्याकडे आहे. या कारवाईने वीज वितरणच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Web Title: Yavatmal: Power distribution executive engineer arrested, six and a half crore irregularities in work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.