यवतमाळ पब्लिक स्कूलच्या चमूची विजयी हॅटट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:15 PM2019-09-02T21:15:36+5:302019-09-02T21:16:21+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि तालुका क्रीडा संयोजन समितीच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले होते. स्पर्धेत ३६ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदविला.

Yavatmal Public School team's winning hat-trick | यवतमाळ पब्लिक स्कूलच्या चमूची विजयी हॅटट्रिक

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या चमूची विजयी हॅटट्रिक

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळ तालुकास्तरीय शालेय फुटबॉल : १९ वर्ष मुलांमध्ये जाजू कॉलेज विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत यवतमाळ पब्लिक स्कूलने जबरदस्त कामगिरी करीत १४ व १७ वर्षे मुले आणि १७ वर्ष मुलींच्या गटात अव्वल स्थान पटकावित विजेतेपदाची हॅटट्रिक केली. १९ वर्ष मुलांच्या गटात जाजू ज्युनिअर कॉलेजने विजय संपादन करीत जिल्हास्तरावर प्रवेश केला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि तालुका क्रीडा संयोजन समितीच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले होते. स्पर्धेत ३६ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदविला.
१४ वर्ष मुलांच्या गटात यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) विरूद्ध फ्री मेथॉडिस्ट इंग्लिश स्कूल यांच्यात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात वायपीएस संघाने १ विरूद्ध ० गोलने विजय संपादन केला. आदित्य चौधरीने विजयी गोल केला. मुलींच्या गटात पोदार स्कूल संघाने वायपीएस स्कूल संघाचा एका गोलने पराभव करून विजय प्राप्त केला. १७ वर्ष मुलांच्या गटात वायपीएस संघाने संघर्षमय सामन्यात पोदार स्कूल संघाचा २ विरूद्ध १ गोलने पराभव करीत जिल्हास्तरावर प्रवेश केला. मुलींच्या गटात देखील वायपीएसने दमदार कामगिरी करीत अव्वल स्थान पटकाविले. पोदार संघाचा २-० गोलने पराभव केला. १९ वर्ष मुलांच्या गटात जाजू ज्युनिअर कॉलेज संघाने जवाहरलाल दर्डा ज्युनिअर कॉलेज संघाचा २-१ गोलने पराभव करीत विजय प्राप्त केला. मुलींच्या गटात केवळ एकच संघ सहभागी झाल्यामुळे साई विद्यालय संघाला जिल्हास्तरावर पुढे चाल देण्यात आली.
स्पर्धेत तालुका क्रीडा संयोजक म्हणून राहुल ढोणे, स्पर्धा संयोजक म्हणून प्रवीण कळसकर यांनी जबाबदारी सांभाळली. पंच म्हणून अभिजित पवार, करण वरखडे, श्याम तायवाडे, राजेश कळसकर, कोथळे यांनी काम पाहिले.

Web Title: Yavatmal Public School team's winning hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा