यवतमाळात रविवारपासून ‘समता पर्व-२०१९’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 09:50 PM2019-05-16T21:50:32+5:302019-05-16T21:52:01+5:30
येथील समता मैदानावर ‘समता पर्व-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. याचे उद्घाटन रविवार, १९ मे रोजी सकाळी ७ वाजता गिनिज बूक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद असलेले डॉ. पी.जे. सुधाकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील समता मैदानावर ‘समता पर्व-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. याचे उद्घाटन रविवार, १९ मे रोजी सकाळी ७ वाजता गिनिज बूक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद असलेले डॉ. पी.जे. सुधाकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समता पर्व हे यवतमाळकरांसाठी वैचारिक प्रबोधनाची पर्वणी आहे. येथे वैचारिक मंथनासोबत मनोरंजनात्मक व प्रतिभा उंचाविण्यासाठी विविध स्पर्धा होतात. यवतमाळ आयडॉल, चित्र प्रदर्शन, समता विचार वेध सत्र, एक क्षण गौरवाचा हे कार्यक्रम येथे घेण्यात येतात. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, नरेंद्र फुलझेले, अनिल बहादुरे, डॉ. मिलिंद कांबळे, दीपक चवने, गजानन उले, संतोष मनवर, डॉ. दिलीप महाले, दीपक नगराळे, सिद्धार्थ भवरे, संदीप कोटंबे, प्रमोदिनी रामटेके, पुष्पा राऊत, अॅड. रामदास राऊत, शैलेश गाडेकर, अॅड. जयसिंह चव्हाण, जनार्दन मनवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिओ सार्इंटिस्ट सरविंदराम राहणार आहे. समता पर्वाचे संस्थापक डॉ. हर्षदीप कांबळे आणि कर्नाटकातील वक्ते रवीकीर्ती सी मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राला अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वºहाडे, सुरेश मडावी, राजुदास जाधव, अशोक वानखेडे, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. दिलीप घावडे, मनोहर सहारे, भीमराव गायकवाड, प्रा. भीमराव ढेंगळे, चंद्रप्रकाश वाहने, घनश्याम भारशंकर, अॅड. मिलिंद भगत, नरेंद्र गद्रे उपस्थित राहणार आहेत.
२० मे रोजी सायंकाळी यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी होणार आहे. यावेळी पत्रकार उर्मिलेश ‘समकालीन समाज और लोकतंत्र का भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींना पुरस्कार दिले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोबरे, प्रमुख अतिथी चंद्रशेखर खंदारे, विशाल जाधव, राहुल भरणे, सुनील कुंडावार, गणेश राठोड, सुनील अवचार, बाळकृष्ण सरकटे, शैलेश तेलंग, विलास काळे, प्रकाश भस्मे उपस्थित राहणार आहेत.
२१ मे रोजी डॉ. रेखा मेश्राम (औरंगाबाद) यांचे ‘समताधिष्ठित मूल्य रूजविण्यासाठी स्त्रियांची भूमिका’ यावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा फुलझेले, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लीला भेले, पल्लवी रामटेके, राखी भगत, उज्ज्वला इंगोले, सुनीता काळे, चिंतामण वंजारी, कुंदा मडावी, विद्या खडसे, ललित वाघ, संगीता शिंदे उपस्थित राहणार आहे.
२२ मे रोजी समता पर्वाचा समारोप असून अध्यक्षस्थानी माणिकराव ठाकरे, तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार नीलय नाईक, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार प्रा. राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, सभापती प्रज्ञा भुमकाळे, अनिल आडे, बाळासाहेब मांगुळकर, राजुदास जाधव, आनंद गायकवाड, आनंद गावंडे, बिपीन चौधरी, मो. तारिक लोखंडवाला, महेंद्र मानकर, रणधीर खोब्रागडे, राजेश्वर निवल, प्रशांत नगराळे, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.