यवतमाळच्या जलतरणपटूंना १५ सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:24 PM2018-09-27T22:24:37+5:302018-09-27T22:27:02+5:30

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या जलतरण पटूंनी १४, १७ व १९ वर्ष अशा तिनही वयोगटात नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल १५ सुवर्ण व १७ रजत पदकाची लयलूट करीत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला.

Yavatmal Swimmers 15 Gold | यवतमाळच्या जलतरणपटूंना १५ सुवर्ण

यवतमाळच्या जलतरणपटूंना १५ सुवर्ण

Next
ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरी : उमरखेडचे जलतरणपटूही चमकले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या जलतरण पटूंनी १४, १७ व १९ वर्ष अशा तिनही वयोगटात नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल १५ सुवर्ण व १७ रजत पदकाची लयलूट करीत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला.
क्रीड व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ संघातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यवतमाळच्या खेळाडूंनी १९ वर्ष मुला-मुलींच्या गटात सर्वाधिक सहा सुवर्ण व नऊ रजत पदक जिंकले. त्या खालोखाल १४ वर्ष गटात ६ सुवर्ण व ७ रजत पदक प्राप्त केले. जिल्ह्यातील पदक प्राप्त खेळाडू याप्रमाणे- कौटील्य मेश्राम -१०० मीटर बटरफ्लाय-सुवर्ण व २०० मीटर बटरफ्लाय रजत, संकल्प गवई- २०० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, अर्जून गावंडे १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, शर्वरी गावंडे- ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर बँकस्ट्रोक सुवर्ण, रिशिका पटेल-२०० मीटर आय.एम, ४०० मीटर, फ्रीस्टाईल-रजत, प्राजक्ता मकेसर - १०० मीटर, २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक रजत, गुणगुण चौधरी - ५० मीटर, बटरफ्लाय सुवर्ण, १०० मीटर, फ्रीस्टाईल रजत, वंशिका मुन - १०० मीटर बॅकस्ट्रोक रजत.
१७ वर्ष वयोगटात- वेदांत तुमसरे -२०० मीटर, फ्री स्टाईल रजत पदक, १९ वर्ष वयोगटात- ईश्वरी गावंडे - १०० मीटर, व २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक, तनया पांडे- १०० मीटर, व २०० मीटर, फ्री स्टाईल रजत, आदेश शेंडे -१०० मीटर व २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक्स रजत, ४०० मीटर, आयएम सुवर्ण, दिग्विजय कनरासे ५० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, स्नेहल घाडगे - ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर बॅक स्ट्रोक रजत, अर्जून पाटील - १० मीटर बॅक स्ट्रोक सुवर्ण, क्रिष्णा रणवले १०० मीटर व २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक. हे सर्व खेळाडू आझाद मैदान येथील शासकीय जलतरण तलावात सराव करतात. त्यांना कुणाल सिंग चौहाण, जिल्हा हौसी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुरेश गावंडे, चंदू बिडवई, वीरेंद्र तुमसरे, हरिश शेंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व पदक प्राप्त खेळाडू नागपुर येथे ३० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करतील. खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, अभय धोबे, क्रीडा भारतीचे दिलीप राखे, मनोज गढीकर, मीराताई फडणीस यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Yavatmal Swimmers 15 Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.