Yavatmal: झाडाखाली आश्रय घेतला अन तिथेच घात झाला, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By विलास गावंडे | Updated: May 21, 2024 23:02 IST2024-05-21T23:02:08+5:302024-05-21T23:02:25+5:30
Yavatmal News: आर्णी तालुक्यातील दाभडी येथे विजांच्या कडकडाटात प्रचंड वादळ झाले. यात वीज काेसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला; तर ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

Yavatmal: झाडाखाली आश्रय घेतला अन तिथेच घात झाला, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
आर्णी (यवतमाळ) - तालुक्यातील दाभडी येथे विजांच्या कडकडाटात प्रचंड वादळ झाले. यात वीज काेसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला; तर ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
शेतात मशागतीच्या कामासाठी गेले असता पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत ट्रॅक्टरचालक व शेतकऱ्याने झाडाखाली आश्रय घेतला. येथेच त्याचा घात झाला. विठ्ठल तुकाराम इंगळे (७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे; तर ट्रॅक्टरचालक संताेष चव्हाण (१९) हा जखमी आहे. दाेघांनाही ग्रामस्थानी आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले. ताेपर्यंत विठ्ठल इंगळे यांचा मृत्यू झाला हाेता. जखमी संताेष चव्हाण याच्यावर उपचार सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. आर्णी, बाभूळगाव, महागाव, उमरखेड, कळंब परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कळंब येथे प्रभाग क्र.१४ मधील चिंचेचे दोनशे ते अडीचशे वर्ष जुने झाड जमीनदोस्त झाले.