Yavatmal: कडेकाेट बंदाेबस्तानंतरही उबाठा सेनेचे आंदाेलन, मुख्यमंत्र्याच्या सभास्थळी उडाला गाेंधळ, पाेलिसांची धावपळ
By सुरेंद्र राऊत | Published: October 30, 2023 07:32 PM2023-10-30T19:32:14+5:302023-10-30T19:33:05+5:30
Yavatmal News: यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर किन्ही येथे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसह मराठा आंदाेलकांची धरपकड करण्यात आली. त्यानंतरही गनिमी कावा पध्दतीने उबाठा सेनेच्या सैनिक थेट सभास्थळाच्या प्रवेश दारावर पाेहाेचले.
- सुरेंद्र राऊत
यवतमाळ - शहरातील आर्णी मार्गावर किन्ही येथे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी दाेन दिवसापासूनच शहरात कडेकाेट बंदाेबस्त लावण्यात आला. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसह मराठा आंदाेलकांची धरपकड करण्यात आली. त्यानंतरही गनिमी कावा पध्दतीने उबाठा सेनेच्या सैनिक थेट सभास्थळाच्या प्रवेश दारावर पाेहाेचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा येताच आंदाेलकांनी फलक दाखवत ‘शेत मालाला भाव नाही म्हणे शासन आपल्या दारी’ अशा घाेषणा देत निषेध केला.
शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्रांच्या सभेत काळे झेंडे दाखवत शेतकरी व ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कापसाला भाव द्या, सोयाबिनला भाव द्या, शेत खर्डीचे पैसे द्या या घोषणेसह पन्नास खोके एकदम ओके,गद्दार गद्दार अश्या घोषणा देऊन शिंदे,राठोड व भावना गवळी यांचा तीव्र निषेध केला. सभास्थळी या वेळी एकच गोंधळ उडाला होता. पाेलिसांनी निर्दशने करणारे किशोर इंगळे,ऍड.श्रीकांत माकोडे, कल्पना दरवई, गजानन पाटील, अतुल गुल्हाने, मंदाताई गाडेकर,गणेश महाराज चांदेकर, संतोष गदई, नंदाताई भिवगडे, सुनीता हरणखेडे, गोलू जोमदे यांनाना ताब्यात घेऊन अटक केली. तर जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, अनिल डिवरे यांना सभास्थळी जाण्यापूर्वीच आर्णी रोडवर ताब्यात घेतले. यांनतर संभाजी ब्रिगेडचे सुरज खाेब्रागडे यांनी विविध मागण्यासाठी हाता फलक घेवून निर्दशने केली. शासनान शेतकऱ्याचे मरण आपल्या दारी असे अभियान राबवत असल्याचा आराेप त्यांनी केला. पाेलिसांनी त्यांनाही तत्काळ ताब्यात घेवून अटक केली.
राज्यभर पेटलेल्या मराठा आंदाेलनामुळे कार्यक्रम स्थळी गाेंधळ हाेवू नये यासाठी पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त लावण्यात आला. त्यानंतरही साेमवारी सकाळीच अज्ञाताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकाला काळे फासले, तर काही फलक फाडून टाकले. ऐन वेळेवर नगरपालिकेच्या यंत्रणेने हे फलक काढून टाकण्यासाठी धडपड केली. यापूर्वीच शहरासह जिल्ह्यातील मराठा आंदाेलकासह , काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) या कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना यवतमाळ पासून ११० किलाेमीटश्र अंतरावर असलेल्या वणी पाेलिस ठाण्यात स्थानबध्द करून ठेवण्यात आले हाेते.