यवतमाळचा पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:53 PM2018-06-14T21:53:17+5:302018-06-14T21:53:17+5:30

फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

Yavatmal water supply will be restored in eight days | यवतमाळचा पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत होणार

यवतमाळचा पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत होणार

googlenewsNext
ठळक मुद्देप्राधिकरणाची माहिती : निळोणा धरणावरून पाणीपुरवठा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. गुरुवारपासून निळोणा धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाला असून चापडोहवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना आणखी आठ दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यवतमाळ शहरात यंदा अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. प्रशासनाने केलेले सर्व उपाय फेल गेल्याने नागरिकांना अक्षरश: पाणी विकत घ्यावे लागले. अशा स्थितीत सर्वांची आशा पावसावर होती. अपेक्षेप्रमाणे मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येपासून यवतमाळ शहरात जोरदार पाऊस बरसला. १० जूनपर्यंत यवतमाळ शहरात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. सतत पाच दिवस कोसळलेल्या या पावसाने यवतमाळ शहराच्या जीवनदायी निळोणा प्रकल्पात जलसाठा झाला. पुरेसा जलसाठा नसला तरी शहराला पाणीपुरवठा होईल एवढे पाणी या प्रकल्पात गोळा झाले आहे. त्यामुळेच जीवन प्राधिकरणाने या प्रकल्पात उपलब्ध जलस्रोताचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. या जलसाठ्यावर इमरर्जन्सी पंप बसवून १४ जूनपासून निळोणा धरणावरून होणाºया भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सदर पाणीपुरवठा हा आधीच्याच नियोजनाप्रमाणे राहणार आहे. निळोणा प्रकल्पावरून शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.
तर शहरातील दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वाघापूर नाका, पिंपळगाव, वैभवनगर येथील टाकीच्या माध्यमातून चापडोह प्रकल्पाचे पाणी पुरविले जाते. त्यापैकी सुयोगनगर आणि लोहारा टाकीत गोखीचे पाणी येत आहे. आता येत्या आठ दिवसात चापडोह धरण परिसरातून पाणीपुरवठा होणाºया भागालाही निळोणातूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी फ्लोटिंग पंप आणि निळोणा व चापडोह पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे काम सुरू आहे. त्यासाठी आणखी आठ दिवसाचा अवधी लागणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. धरणातील उपलब्धतेनुसार यवतमाळ शहरात पाणीपुरवठा कालावधी ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अखेर निळोणाच धावला मदतीला
यवतमाळातील भीषण टंचाई काळातही भ्रष्ट कामकाजामुळे बेंबळा व पर्यायी व्यवस्था असलेल्या गोखी प्रकल्पाचे पाणी संपूर्ण उन्हाळाभर मिळू शकले नाही. पहिल्या पावसातच कोरडा ठण्ण झालेल्या निळोणा प्रकल्पाच्या पातळीत वाढ झाली. जानेवारीपासून टंचाईच्या झळा सोसत असलेल्या यवतमाळकरांच्या मदतीला अखेर निळोणा प्रकल्पच धावून आला. पाणीटंचाई उपाययोजनाचे केवळ यवतमाळात राजकारण करण्यात आले. श्रेयासाठी धडपडत असताना यवतमाळकर पाण्याविना तडफडले.

Web Title: Yavatmal water supply will be restored in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.