यवतमाळचे सौंदर्य खुलविणार चार नवे पुतळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 09:17 PM2019-05-19T21:17:50+5:302019-05-19T21:19:15+5:30
नगरविकासकडून प्राप्त निधीतून नगरपरिषदेत वैशिष्ट्यपूर्ण कामे घेण्यात आली आहे. यातून शहरातील प्रमुख चौकात सुंदर देखावे साकारले जात आहे. आर्णी नाका येथे क्रांतीवर बिरसा मुंडा यांचा पुतळा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरविकासकडून प्राप्त निधीतून नगरपरिषदेत वैशिष्ट्यपूर्ण कामे घेण्यात आली आहे. यातून शहरातील प्रमुख चौकात सुंदर देखावे साकारले जात आहे. आर्णी नाका येथे क्रांतीवर बिरसा मुंडा यांचा पुतळा लागणार आहे. तर लोहार चौकात भव्य असा नंदी, कॉटन मार्केट चौकात राबणारा शेतकरी आणि पोस्ट आॅफीस चौकात योग मुद्रेतील प्रतिकृती बसविण्यात येणार आहे.
चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर चौक देखणे करण्याचा प्रयत्न आहे. शहरात विविध विकासकामे एकाच वेळी सुरू आहेत. यातच चौकातील देखण्या प्रतिकृती सौंदर्यात भर घालणार आहेत.
प्रतीक्षा रेल्वेचीच
शिवाजी गार्डनमध्ये बालकांसाठी असलेली रेल्वे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. ही रेल्वे सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे. आता तर रेल्वेचे स्पेअरपार्ट खिळखिळे झाले आहेत. यामुळे बालकांचा हिरमोड झाला आहे.