महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 02:57 PM2019-01-05T14:57:41+5:302019-01-05T15:12:12+5:30

जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे.

Yavatmal women's social reforms axle | महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा

महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा

Next
ठळक मुद्देजिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. समाजाचा परिचय मेळावा महिलांनीच घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. समाजाचा परिचय मेळावा महिलांनीच घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

मुकेश इंगोले

दारव्हा (यवतमाळ) - सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये उपवर-वधू परिचय मेळाव्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. असे मेळावे विशेषत: पुरुष कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पार पडतात. मात्र जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. समाजाचा परिचय मेळावा महिलांनीच घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

दारव्हा येथे कुणबी समाजाच्या परिचय, विवाह मेळाव्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे. मध्यंतरी माजी आमदार दिवंगत बाळासाहेब घुईखेडकर मेळावे घेत होते. ११ वर्षांपूर्वी वसंतराव घुईखेडकर यांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून मराठा- कुणबी सर्व शाखांना एकत्र करून सहकार महर्षी बाळासाहेब घुईखेडकर जयंती महोत्सवानिमित्त दरवर्षी मेळावा होतो. पण चार वर्षांपासून या परंपरेतही अत्यंत महत्वाचे पुरोगामी बदल करण्यात आले. मेळाव्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी महिलाच पार पाडतात. सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष प्रा.डॉ. संगीता वसंतराव घुईखेडकर यांच्या नेतृत्वात महिला आयोजनाची जबाबदारी स्वीकारतात आणि यशस्वी करतात. दहा वर्षापूर्वी या महिला मंडळाची स्थापना झाली. त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम होतात. 

राज्यस्तरीय उपवर - वधू परिचय मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी या मंडळाने खांद्यावर घेतली. महिलांना ही जबाबदारी पेलणार नाही, असे सुरुवातीला पुरुष मंडळींना वाटत होते. मात्र नारीशक्तीने हे आव्हान लिलया पेलले. घरोघरी फिरून देणगी गोळा केली. पत्रके व विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धीही करण्यात आली. निमंत्रण पत्रिका वाटल्या. अतिथींना निमंत्रण, परिचय पत्रिका तयार करणे, भव्य मंडप उभारणे, बैठक व्यवस्था, मेळाव्याच्या दिवशी मान्यवरांचे स्वागत, मार्गदर्शन, उपवर - वधूंचा परिचय, समाजबांधवांसाठी भोजनाची व्यवस्था या सर्व बाबी मेळाव्यात यथासांग पार पाडल्या जातात. त्यासाठी महिलाच झटतात. 

वैचारिक मार्गदर्शन अन् सहभागही वाढला

समाजाची वैचारिक पातळी वाढावी याकरीता पूर्णीमाताई सवाई, निलीमा काळे, प्रमिला जाधव, खासदार भावना गवळी, शिक्षण विभागाच्या सहसंचालक अर्चना नेरकर, प्रा. छायाताई महाले, अमरावतीच्या रजिया सुलताना अशा विविध क्षेत्रातील महिलांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले. महिलांनी पुढाकार घेतल्यानंतर महिलांचा सहभाग आणि परिचय देणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  

विवाहांमधील आनाठायी खर्च टाळून यानिमित्ताने समाज एकत्र येत आहे. चार वर्षांपासून हा मेळावा महिलांच्या पुढाकाराने होत असल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. समाजातील पुरुष मंडळींचेही सहकार्य आहे. 

- प्रा.डॉ. संगीता घुईखेडकर, अध्यक्ष, सर्व शाखेय मराठा - कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळ, दारव्हा

Web Title: Yavatmal women's social reforms axle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.