यवतमाळात घनकचरा तुंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:01 PM2019-07-25T22:01:23+5:302019-07-25T22:01:43+5:30

शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आहे.

Yavatmala solidified | यवतमाळात घनकचरा तुंबला

यवतमाळात घनकचरा तुंबला

googlenewsNext
ठळक मुद्देडम्पिंगचा प्रश्न कायम : नगरसेवकाचा इशारा, कचरा टाकण्यासाठी जागाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आहे. शिवसेना नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ व्यवस्था करण्याचा इशारा दिला आहे.
नगरपरिषदेजवळ सावरगड कचरा डेपो व धामणगाव बायपासवरील डम्पिंग यार्ड या दोन जागा हक्काच्या आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. सावरगड कचरा डेपोत अनेक दिवसांपासून परंपरागत पद्धतीने कचरा साठविला जातो. यामुळे लगतच्या गावात दुर्गंधी येते व रोगराई पसरण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मुळात दैनंदिन कचºयाचे विलगीकरण करून त्यातील विघटनशील कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गांढूळ खत निर्मिती अथवा कंपोस्ट तयार होऊ शकते. पूर्वी असा प्रकल्प सावरगड कचरा डेपोत कार्यान्वित होता. मात्र नंतर याकडे दुर्लक्ष करत आलेला कचरा मनमानी पद्धतीने टाकण्यात येत होता. त्यातही वाहन दूर न नेताच अगदी जवळ कचरा टाकून वाहने निघून जात होती. परिणामी विस्तीर्ण परिसर असूनही काही वर्षातच सावरगड कचरा डेपो आता डम्प करण्यायोग्य राहिलेला नाही. सुरुवातीला नगरपरिषदेकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन सावरगड ग्रामस्थांना देण्यात आले होते.
काही दिवस येथे नियमित फवारणी व ट्रायकोडर्मासारख्या विघटकाचा वापरही होत होता. नंतर भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याने निधी हडपून थेट कचरा टाकला जात आहे. यामुळेच हा कचरा डेपो ग्रामस्थांनी बंद करण्यासाठी उग्ररूप धारण केले आहे. त्यानंतर पर्यायी जागा म्हणून धामणगाव बायपासवरील शेताची निवड केली. हे शेतसुद्धा नागरी वसाहतीला लागून आहे. येथे कचºयावर प्रक्रिया करण्याची कोणतीच प्रक्रिया नाही. मृत जनावरेसुद्धा बेमुरवतपणे फेकून दिले जातात. बºयाचदा उन्हाळ्याच्या दिवसात प्लास्टीक पन्न्या जाळण्यात येतात. यातून विषारी धूर बाहेर निघतो. आता चिखलामुळे या भागात घंटागाड्या घेऊन जाता येत नाही. त्यामुळे येथील कचरा डम्पिंग बंद आहे. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून घंटागाड्या प्रभागात येणे बंद केले आहे.
या गंभीर प्रकारात तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते गजानन इंगोले यांनी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.

Web Title: Yavatmala solidified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा