यवतमाळकरांनी लुटला श्रावण गाण्यांचा आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:13 PM2018-09-11T22:13:46+5:302018-09-11T22:14:40+5:30

लोकमत सखी मंच आणि बालविकास मंचच्या संयुक्त विद्यमाने येथे ‘श्रावण गाणी’ संगीत मैफिलीचे टिंबर भवनात आयोजन करण्यात आले होते. या अपूर्व सोहळ्याला विभागातील सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Yavatmalkar looted Shravan songs | यवतमाळकरांनी लुटला श्रावण गाण्यांचा आस्वाद

यवतमाळकरांनी लुटला श्रावण गाण्यांचा आस्वाद

Next
ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि बालविकास मंच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकमत सखी मंच आणि बालविकास मंचच्या संयुक्त विद्यमाने येथे ‘श्रावण गाणी’ संगीत मैफिलीचे टिंबर भवनात आयोजन करण्यात आले होते. या अपूर्व सोहळ्याला विभागातील सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गायिका माधुरी यांनी गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, छाया राठोड, अलका राऊत, गायक किशन तायडे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात किशन तायडे यांनी ‘तु इस तरह से मेरी जिंदगी में’, ‘खई के पान बनारसवाला’ ही गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर किशन तायडे व माधुरी यांनी ‘परदेसिया ये सच है पिया’ हे युगुलगीत सादर केले.
समीर खान यांनी नवी गाणी सादर केली. ‘यमला पगला दिवाना’ या गाण्याने टाळ्या मिळविल्या. माधुरी, समीर खान यांनी अत्यंत सुमधूर शैलीत ‘मेडले’ सादर केले. यात नव्या चित्रपटातील गाण्यांची चपखल सरमिसळ करण्यात आली होती. उपस्थितांकडून यावेळी उत्स्फूर्त दाद मिळाली.
बालविकास मंचची चेताली इंगोले हिने ‘राधा नाचेगी’ गाणे सादर केले. तर पुरब तायडे याने ‘मेरा मुल्क मेरा देश’ गाणे सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमत सखी मंचच्या यवतमाळ जिल्हा संयोजिका दीपा खंडारकर, अमरावतीच्या संयोजिका अंकिता विश्वकर्मा यांनी केले.

Web Title: Yavatmalkar looted Shravan songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.