विकासाच्या नावाखाली यवतमाळकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:22 PM2019-05-08T22:22:54+5:302019-05-08T22:23:26+5:30

विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली. विकासाच्या नावावर लोकांचे हाल केले जात आहे, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे.

Yavatmalkar's place in the name of development | विकासाच्या नावाखाली यवतमाळकरांचे हाल

विकासाच्या नावाखाली यवतमाळकरांचे हाल

Next
ठळक मुद्देसिमेंट रोड फोडले : पाईपलाईन पोहोचलीच नाही, पाणी मिळत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली. विकासाच्या नावावर लोकांचे हाल केले जात आहे, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे. याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही यवतमाळकर संघटनेने केली आहे.
शहरात विकास कामे करताना शासकीय नियमांना धाब्यावर बसविण्यात आले. सिमेंट रोड जागोजागी फोडले आहेत. काही भागात डांबररोड नव्याने तयार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तयार झालेले हे रस्ते आता खोदले जात आहे. ड्रेनेज सिस्टिमची कामे निकृष्ट केली जात आहे. ३०२ कोटी रुपयांची पाईप लाईन आजपर्यंत पूर्ण झाली नाही. नऊ किमीपर्यंतचीच पाईपलाईन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन जागोजागी फुटली आहे. निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असताना यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. पाटीपुरा, अंबिकानगर, इंदिरानगर, भोसारोड, अभिनव कॉलनी या भागात महिनाभरापासून पाणी आले नाही. मुळात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकच पाळले जात नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. यात नागरिकांचे हाल होत आहे.
शहरात नाल्या खोदताना उतार काढला नाही. संपूर्ण काम ओबडधोबड झाले आहे. यामुळे शहरात चालनेही अवघड आहे. विशेष म्हणजे या कामावर कुणाचेही लक्ष नसल्याचा आरोप आम्ही यवतमाळकरांनी केला आहे. यावेळी अ‍ॅड.जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. विपीन ठाकरे, अ‍ॅड. वसंत मोहर्लीकर, सुनील तिवारी, विजय बुंदेला, अविनाश धनेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रत्यक्ष लक्ष घालणार
पाणी पुरवठ्याचे टँकर लावण्यात आल्याचे यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र शहरात कुठेही टँकर सुरू नाही. पालिकेने जिल्हा प्रशासनाला खोटी माहिती दिली, असे तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सांगितले. या प्रकरणी सखोल चौकशी करून प्रत्यक्ष लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांना दिले.

Web Title: Yavatmalkar's place in the name of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.