यवतमाळचा इयत्ता बारावीचा निकाल ९३.५ टक्के
By विशाल सोनटक्के | Published: May 21, 2024 01:47 PM2024-05-21T13:47:31+5:302024-05-21T13:47:54+5:30
Yavatmal : परीक्षेला बसलेल्यांपैकी ९१.२६ टक्के मुले उत्तीर्ण
यवतमाळ: इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. अमरावती विभागाचा निकाल ९३ टक्के लागला असून यवतमाळ जिल्ह्याचा ९३.५ टक्के निकाल लागला आहे. यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. परीक्षेला बसलेल्यांपैकी ९१.२६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात ९५.०६ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.३५ टक्के निकाल नेर तालुक्याचा लागला आहे. तर सर्वात कमी म्हणजे ८३.६० टक्के निकाल तालुक्याचा आहे.
यवतमाळ तालुका ९२.२७ टक्के, दारव्हा ९२.५०, दिग्रस ९४.२०, आर्णी ९६.२७, पुसद ९३.१७, उमरखेड ९४.८८, महागाव ९७.६६, बाभूळगाव ९७.५२, कळंब ९३.१२, राळेगाव ९४.०९, मारेगाव ८७.५५, पांढरकवडा ८८.९८, झरी जामणी ८८.६०, वणी ८३.६० तर घाटंजी तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ९२.६० टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ३१ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २९ हजार १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.