यवतमाळचे भाविक अमरनाथमध्ये अडकले

By admin | Published: July 20, 2016 01:50 AM2016-07-20T01:50:50+5:302016-07-20T01:50:50+5:30

बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेला गेलेले यवतमाळ जिल्ह्यातील भाविक जम्मूमध्ये अडकून पडले आहे. या भाविकांचा

Yavatmal's devotees got stuck in Amarnath | यवतमाळचे भाविक अमरनाथमध्ये अडकले

यवतमाळचे भाविक अमरनाथमध्ये अडकले

Next

राज्यातील २५ हजार भाविक : ३६ तासांपासून जम्मूत वाहनातच मुक्काम
रवींद्र चांदेकर ल्ल यवतमाळ
बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेला गेलेले यवतमाळ जिल्ह्यातील भाविक जम्मूमध्ये अडकून पडले आहे. या भाविकांचा गेल्या ३६ तासांपासून वाहनातच मुक्काम आहे.
अडकलेल्या भाविकांच्या स्थितीबाबत पुसद येथील राधेश्याम जांगीड यांनी जम्मूहून ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, दरवर्षी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेला जातात. यावर्षीही राज्यातील विविध जिल्ह्यातून हजारो यात्रेकरू अमरनाथला गेलेले आहेत. यात यवतमाळसह पुणे, मुंबई, नाशीक, बुलडाणा आदी जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील राधेश्याम जांगीड, कैलास अग्रवाल, ओंकार तोष्णीवाल हे भाविक आपापल्या परिवारासह बुलडाणा येथून अमरनाथ यात्रेला रवाना झाले आहेत. त्यांच्या वाहनात एकूण ५२ प्रवासी आहेत.
बुलडाणा येथून रवाना झालेले हे वाहन सोमवारी जम्मूत पोहोचले. तेथून त्यांचे वाहन रामबाणमार्गे पुढील प्रवासासाठी अमरनाथकडे निघाले. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे वाहन रामबाणसमोरील सैतान नाल्याजवळ पोहोचले. या नाल्यावरच कॅनल बांधलेला आहे. त्या कॅनलच्या पलीकडे तेथील सुरक्षा दल कोणत्याच वाहनाला समोर जाऊ देत नाही. समोर गोटमार सुरू आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, पुढे आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही, असे सांगून सुरक्षा दलाने सर्व वाहने तेथेच रोखून ठेवली आहे.
सोमवारी दुपारपासून जवळपास ६०० वाहने कॅनलजवळ अडकून पडल्याने त्यातील सर्व प्रवाशांना सोमवारची रात्र वाहनातच काढावी लागली. यात महिला आणि बालकांची प्रचंड ओढाताण झाली. जीव मुठीत धरून त्यांनी रात्र कशीबशी काढली. मात्र मंगळवारीही त्यांची वाहने समोर जाऊ देण्यात आली नाही. त्याुमळे सर्व भाविकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच खाण्यापिण्याची सुविधा नसल्याने त्यांचे हाल होत आहे. तथापि काही सामाजिक संघटनांनी ही स्थिती लक्षात घेऊन मंगळवारी लंगरचे आयोजन केले. त्यामुळे भाविकांच्या जेवणाची सोय झाली. या सामाजिक संघटनांचे सर्व भाविकांनी आभार मानले.

Web Title: Yavatmal's devotees got stuck in Amarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.