६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 07:49 PM2023-05-02T19:49:20+5:302023-05-02T19:50:14+5:30

Yawatmal News विदर्भ आणि कर्नाटकच्या सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामान विभागाने ६ मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे.

Yellow alert till May 6; A low pressure belt over Vidarbha, Karnataka border |  ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा 

 ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा 

googlenewsNext

यवतमाळ : विदर्भ आणि कर्नाटकच्या सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामान विभागाने ६ मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यात ४ मेपर्यंत जिल्ह्यात वादळवाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस रिमझिम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गत सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. प्रारंभी २ मेपर्यंत वर्तविलेला पावसाचा अंदाज हवामान विभागाने आणखी ६ मेपर्यंत वर्तविला आहे. विदर्भ आणि कर्नाटकच्या सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यासह विदर्भाला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यात ३ आणि ४ तारखेला मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

३५ घरांची अंशत: पडझड

यवतमाळ जिल्ह्यात वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने एक जनावर ठार झाले, तर ३५ घरांची अंशत: पडझड झाली. २३ हेक्टरचे नुकसान झाले. यात मारेगावमध्ये ११, केळापूर १०, राळेगावमध्ये २ हेक्टरचे नुकसान झाले. सततच्या पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार आहे.

Web Title: Yellow alert till May 6; A low pressure belt over Vidarbha, Karnataka border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.