होय, आम्ही महागड्या कोचिंगविना झालो पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:06 PM2019-05-30T21:06:45+5:302019-05-30T21:07:20+5:30

बारावीचा निकाल आला. शाळांपेक्षाही कोचिंग क्लासेस चालकांचीच स्पर्धा सुरू झाली. अमका टॉपर आमच्याच क्लासेसचा असल्याची आवई उठविली जाऊ लागली. मात्र समाजात असेही काही टॉपर विद्यार्थी आहेत, ज्यांनी कुठलाही कोचिंग क्लास लावला नाही. पैसे नव्हते, पण पुढे जाण्याची जिगिषा होती. अखेर त्यांच्यासाठी यवतमाळातील संवेदनशील शिक्षकही सरसावले.

Yes, we got expensive coaching without getting passed | होय, आम्ही महागड्या कोचिंगविना झालो पास

होय, आम्ही महागड्या कोचिंगविना झालो पास

Next
ठळक मुद्देगरिबाघरच्या गुणश्रीमंत विद्यार्थ्यांची रणदुदुंभी : यवतमाळातील संवेदनशील शिक्षकांनी घडविले ‘मोफत’ भविष्य

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बारावीचा निकाल आला. शाळांपेक्षाही कोचिंग क्लासेस चालकांचीच स्पर्धा सुरू झाली. अमका टॉपर आमच्याच क्लासेसचा असल्याची आवई उठविली जाऊ लागली. मात्र समाजात असेही काही टॉपर विद्यार्थी आहेत, ज्यांनी कुठलाही कोचिंग क्लास लावला नाही. पैसे नव्हते, पण पुढे जाण्याची जिगिषा होती. अखेर त्यांच्यासाठी यवतमाळातील संवेदनशील शिक्षकही सरसावले. आणि गुरु-शिष्याच्या अनोख्या जिव्हाळ्यातून कोचिंग शिवायच २४ विद्यार्थी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाले.
बारावीचे वर्ष म्हटले की, आई-वडील मुलासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार होतात. मात्र अनेक मुलांच्या आई-वडिलांकडे कोचिंग क्लाससाठी पैसा नसतो. अशा गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळात मोफत मार्गदर्शन वर्गाचा प्रयोग करण्यात आला. गुरुदेव सेवा मंडळ, राष्टÑसंत तुकडोजी महाराज विचारमंच, निर्मिक महिला मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला. यंदा बारावीचे २५ विद्यार्थी या वर्गात सहभागी झाले होते. त्यातील २४ विद्यार्थी घसघशीत गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाले.
येथील नरेश उन्हाळे गुरुजी यांनी ही संकल्पना राबविली. तर नितेश जयसिंगपुरे, शिवेश पांडे, राजेश मुके, पूजा साबळे, गणेश अजमिरे, मंगेश शहारे या शिक्षकांनी दररोज या गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले. उन्हाळे गुरुजींच्या घरात, अंगणात हा वर्ग भरला.
विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाशिवाय कधीही यावे, तिथेच बसून अभ्यास करावा, अडचणी आल्यास तिथेच मार्गदर्शकांना विचारुन सोडवून घ्याव्या, असे या मार्गदर्शन वर्गाचे स्वरुप होते. या वर्गासाठी लागणारी आर्थिक व इतर मदत प्रमोद अजमिरे, वामन गोरे, विजय साबापुरे, कृष्णराव मस्के, राजाभाऊ राऊत, सतीश भोयर यांनी देऊ केली. बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्तम निकाल दिला आहे. आता याच मोफत मार्गदर्शन वर्गातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशादायक निकालही लवकरच कळणार आहे.

कोचिंगवाले ‘मोफत’वर भडकले
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. या वर्गातील विद्यार्थ्यांचा बारावीचा निकालही ९८ टक्के लागला. होतकरू विद्यार्थ्यांसाठी एकीकडे संवेदनशील शिक्षक झटत असताना या मोफत वर्गावर गल्लाभरू कोचिंग क्लासवाले मात्र संतापले आहे. कोचिंग क्लासेसवाल्यांनी चक्क मोफत मार्गदर्शन वर्गाविरुद्ध माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेत तक्रार केली आहे.

आम्ही २००६ पासून मानवता मंदिरात नापास मुलांसाठी हा प्रयोग सुरू केला होता. तीन-तीन वेळा नापास झालेले विद्यार्थी या वर्गामुळे आज नोकरीत लागले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून गरीब घरातील ‘रेग्युलर’ विद्यार्थ्यांसाठी हा वर्ग चालविला जात आहे.
- उन्हाळे गुरुजी
सामाजिक कार्यकर्ते, यवतमाळ.

Web Title: Yes, we got expensive coaching without getting passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.