तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:37 PM2019-02-18T21:37:29+5:302019-02-18T21:38:02+5:30
तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तू पाह्यत राह्यली सगुण,
लोक चंद्रावर गेले निघून
अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे. ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात रुपेश कावलकर आणि पुनित मातकर यांच्या संचलनाने रंगत आणली. प्रख्यात शायर मन्सूर एजाज जोश हे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. भेटलेली माणसे मी काळजाने जोडली, असा शेर सादर करीत किशोर तळोकार यांनी दमदार सुरूवात केली. त्यांना दाद देत कवी हेमंत कांबळे यांनी कविता सादर केली.
अरे आम्ही परिस्थितीनं
कफल्लक असलो तरी
बाबासाहेबांच्या इचाराचे
सच्चे पाईक आहोत
अन् तुमचा आवाज
मोठा करणारे आमीच
माईक आहोत
शिवलिंग काटेकर, गजानन छबिले, संतोष कोकाटे, प्रा.संजय कावरे, धीरज चावरे, प्रा. दिनकर वानखेडे, गुलाब सोनोने यांनी दर्जेदार रचना सादर केल्या. डॉ. मनिष सदावर्ते, विजय ढाले, नीलेश तुरके यांच्या कवितांना रंगत आणली. कवी गजेश तोंडरे यांनी फुलांचे स्वभाव सांगणारी कविता सादर केली. जयंत कर्णिक, अन्नपूर्णा चौधरी, अमर पवार, तात्याजी राखुंडे, महेश अडगुलवार, डॉ.दीपक सव्वालाखे, भीमराव वानखडे, कल्पना मादेश्वार, नितीन धोटे, सुरेश गांजरे, प्रमिला उमरेडकर, किरण वैद्य, राजश्री बिंड, जयकुमार वानखडे, महेश किनगावकर, पुष्पलता भंबुलकर, जयंत अत्रे, पुष्पाताई नागपुरे यांनी कविता सादर केल्या.
प्रथम सत्रात नरेंद्र इंगळे यांनी पाण्याचा हंडा ही विनोदी कथा सादर केली. मुकूंद तेलीचरी यांनी ओरिएन्टल सर्कस, तुळशीराम बोबडे यांनी कथा सादर केली. प्रा.वसंतराव पुरके अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे, सचिव हिंमत ढाळे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापूरे, जयंत बापू पाटील, सिकंदर शहा, मनोहर शहारे, जिल्हाध्यक्ष विद्या खडसे, शाखाध्यक्ष प्रमोद देशपांडे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी प्रमोद देशपांडे, सुरेश राऊत, सुनील खडसे, तोष्णा मोकडे, महेश किनगावकर, सुवर्णा ठाकरे, समीना शेख, महेश मोकडे, अलका राऊत आदींनी परिश्रम घेतले.