पिवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, मृतदेहाजवळ वाघाचा सहा तास ठिय्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 06:28 PM2021-07-10T18:28:40+5:302021-07-10T18:29:11+5:30

Tiger Attack: या घटनेने परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पसरली आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून जोपर्यंत ‌वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.

A young man was killed in a tiger attack at Pivardol | पिवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, मृतदेहाजवळ वाघाचा सहा तास ठिय्या 

पिवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, मृतदेहाजवळ वाघाचा सहा तास ठिय्या 

googlenewsNext

यवतमाळ - पाटणबोरी येथून जवळच असलेल्या पिवरडोल येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गावालगत शौचास गेलेल्या एका युवकावर वाघाने
हल्ला करून त्याला ठार मारले. ही घटना शनिवारी सकाळी ५ वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत
पसरली आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून जोपर्यंत ‌वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार
नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी २ वाजेपर्यंत युवकाचा मृतदेह घटनास्थळीच पडून
होता. घटनास्थळी पोलिसांचा ताफा व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र सायंकाळपर्यंत त्यात यश आले नव्हते. (A young man was killed in a tiger attack at Pivardol)

अविनाश पवन लेनगुरे (१८) मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो गावालगत शौचासाठी गेला असता, झुडूपात दडी मारून बसलेल्या
वाघाने त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर त्याला अशोक प्रधान यांच्या शेतात फरफटत नेले. या वाघाने रात्रभर झुडपातच अ‌विनाशच्या
मृतदेहाजव‌ळ ठिय्या मांडला. अ‌‌विनाश पहाटेपर्यंत घरी न आल्याने त्याचा कुटुंबियांकडून शोध घेण्यात आला. तेव्हा, पहाटे ५ वाजता,
घटनास्थळी पाण्याचे टमरेल, मोबाईल व रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरताच,
हजारो गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शोध घेतला असता, अशोक प्रधान यांच्या शेतातील एका झुडूपात वाघ बसून असलेला दिसून
आला. त्याच्या शेजारीच अविनाशचा मृतदेह पडून होता. त्यामुळे गावकऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटे ५
वाजतापासून १०.३० वाजेपर्यंत तब्बल साडेपाच तास वाघ मृतदेहाशेजारी ठिय्या देऊन होता. त्यानंतर त्याला हुसकावून लावण्यात यश आले.


वाघाला पाहण्यासाठी पाटणबोरी, मांडवी, पिवरडाेल, गवारा परिसरातील नागरिक हजारोच्या संख्येने गर्दी केली. बॉक्स: पिवरडोल परिसरात
पाच वाघांचा वावर झरी तालुक्यातील मांडवी बीटाअंतर्गत येणाऱ्या पिवरडाेल परिसरात पाच वाघांचे अस्तित्व आहे. यामध्ये एक वाघिण व चार बछड्यांचा समावेश आहे. हा हल्ला ‘रंगीला’ नामक बछड्याने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी घटनास्थळावर आमदार संजीवरेड्डी बाेदकुरवार, वणीचे
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुुज्जलवार, पाटणच्या ठाणेदार संगीता हेलाेंडे, मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने आदींनी भेट दिली. मृत
अविनाशचा शेतीवर उदरनिर्वाह असून आई-वडिलांचा एकुलता एक आधार होता. त्याला एक बहीण आहे. कुटुंबाचा आधार गेल्याने
अविनाशचे कुटुंब हादरून गेले आहे. मृताच्या कुटुंबाला तातडीने ५० लाख रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली
आहे.

Web Title: A young man was killed in a tiger attack at Pivardol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ