नेर आंजती रोडवर तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:25 AM2020-03-10T10:25:45+5:302020-03-10T10:25:50+5:30
मंगळवारी सकाळी सात वाजता वाहनचालकांना हा प्रकार दिसला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने हा घात की अपघात ? अशी चर्चा सुरू आहे.
नेर(यवतमाळ)- नेर तालुक्यातील कारंजा रोडवर एका युवकाचा मृतदेह आढळला. मंगळवारी सकाळी सात वाजता वाहनचालकांना हा प्रकार दिसला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने हा घात की अपघात ? अशी चर्चा सुरू आहे. अमोल बबन गौरखेडे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तो सकाळी चार वाजता घराबाहेर गेला. तो अशोकनगर नेरचा रहिवासी आहे.
कारंजा रोडवर आंजती नेरदरम्यान रस्त्याच्या मधोमध त्यांचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. अपघात असेल तर इतर ठिकाणी मार का लागलेला दिसत नाही, तो अशोकनगरवरून या रोडवर गेला कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी कोलुरा रोडवर बोरकर यांचा असाच मृतदेह आढळला, मात्र त्याचा तपास पुढे सरकला नाही. आता अशाच प्रकारे अमोलचा मृतदेह सापडला. आता हा घात की अपघात ? याचा तपास नेर पोलीस करीत आहे. मृत अमोलच्या मागे मुलगी,पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.