'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 06:14 PM2021-12-26T18:14:48+5:302021-12-26T18:25:33+5:30

पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अखेर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केली.

young woman commits suicide due to Sexual harassment by a police showing the lure of a job | 'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार

'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्दे‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अखेर अटक, सात दिवसांची कोठडी

यवतमाळ : उमरखेड येथील एका पोलिसाच्या घरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह शुक्रवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा पुढे आला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अखेर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केली.

विजय हटकर (४२) असे अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जिल्हा दंगल नियंत्रक पथकात कार्यरत आहे. बंदोबस्ताच्या कामासाठी त्याला उमरखेड येथे नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून तो येथील वसंतनगर भागात कृष्णा बारसकर यांच्याकडे भाड्याच्या घरात राहात होता. याच काळात त्याने घृणास्पद कृत्य केल्याचे पुढे आले आहे.

मृत २० वर्षीय तरुणी ही पुसद तालुक्यातील वेणी येथील रहिवासी आहे. या मुलीला पोलिसात नोकरी लावून देतो, त्यासाठी उमरखेड येथील खासगी पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून विजय हटकरने आपल्या घरात ठेवून घेतले. त्यातच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मात्र, शुक्रवारी या तरुणीने हटकर याच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणीचे वडील संजय कोरडे यांनी आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती तसेच शवविच्छेदन अहवालातूनही ही बाब पुढे आली. त्यावरून शनिवारी रात्री विजय हटकर याला उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी अटक केली. हटकर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.

रजा घेऊन केले घृणास्पद कृत्य 

दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विजय हटकर याने ६ डिसेंबरपासून रजा घेतली होती, अशी माहिती ठाणेदार अमोल माळवे यांनी दिली. मात्र, याच काळात त्याने वेणी येथील तरुणीची फसवणूक करून अत्याचार केला. आता या प्रकरणात हटकर याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटकही केली आहे. त्याला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली, असेही ठाणेदार माळवे यांनी सांगितले.

* संबंधित बातमी : 20 वर्षीय तरुणीने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच गळफास लावून घेतल्याने खळबळ

Web Title: young woman commits suicide due to Sexual harassment by a police showing the lure of a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.