यवतमाळात मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Published: November 23, 2015 02:13 AM2015-11-23T02:13:12+5:302015-11-23T02:13:12+5:30

गत पिढीतील ख्यातनाम मराठी कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा. शरश्र्चंद्र टोंगो जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकमतने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा...

Youth award ceremony in Yavatmal on Tuesday | यवतमाळात मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा

यवतमाळात मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा

Next

शरश्र्चंद्र टोंगो राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धा
यवतमाळ : गत पिढीतील ख्यातनाम मराठी कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा. शरश्र्चंद्र टोंगो जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकमतने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात होत आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग, इतिहास तज्ज्ञ अरुण हळबे उपस्थित राहणार आहे. कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा. शरश्र्चंद्र टोंगो हे यवतमाळचे भूषण मानले गेलेले व मराठी कथा विश्वाला एक वेगळे व आकर्षक वेगळे वळण देणारे कथा लेखक होते. खांडेकर, फडके व माडगुळकरांसारखे ज्येष्ठ कथा लेखक ज्या काळात लिहित होते. त्या काळात आपल्या कथेचा आगळा ठसा उमटविण्याचा मान कै.प्रा. टोंगो यांच्याकडे जातो. त्यांनी लोकमतच्या आरंभ काळात त्यात लेखन केले व त्याचा वाङ्मयीन दर्जा उंचावला. त्यांच्या लिखाणाने लोकमत एवढेच मराठी साहित्यही प्रगल्भ झाले. विदर्भ आणि महाराष्ट्रात त्यांचे साहित्य क्षेत्रात नाव आदराने घेतले जाते. बाल साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला होता.
लोकमतच्यावतीने आयोजित राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेत मराठीतील ५०० हून अधिक लेखक व लेखिकांनी भाग घेतला. या सहभागात तामिळनाडूपासून महाराष्ट्रपर्यंतचे अनेक नवे व जुने लेखक एकत्र आले. या कथामधून पुरस्कारासाठी कथांची निवड करणे अवघड व्हावे एवढ्या या सगळ्या कथा दमदार व चांगल्या होत्या. लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार आणि ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांनी हे जिकरीचे काम हसतमुखाने व लोकमतविषयीच्या आस्थेने पूर्ण केले.
या सोहळ्याला लोकमत, कै.प्रा. टोंगो यांच्या विस्तृत परिवारातील साऱ्यांनी अगत्याने उपस्थित रहावे, अशी विनंती लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले आहे.
(उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: Youth award ceremony in Yavatmal on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.