विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 10:23 PM2022-10-06T22:23:50+5:302022-10-06T22:24:19+5:30

प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झाला. यातूनच प्रवीणची हत्त्या करण्यात आली. त्याच्यावर साहील संजय रामटेके रा. आंबेडकरनगर, प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल ऊर्फ पीजी यांनी हल्ला केली.

Youth killed in immersion procession | विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा खून

विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात मंगळवारी दुर्गादेवी विसर्जनाला सुरुवात झाली. याच मिरवणुकीत अक्षय राठोड टोळीतील प्रवीण केराम या युवकाचा रात्री ९.३० वाजता पाच जणांनी चाकूने भोसकून खून केला. प्रवीण केराम याला वाणीपुरा येथील गल्लीत गाठून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. 
प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झाला. यातूनच प्रवीणची हत्त्या करण्यात आली. त्याच्यावर साहील संजय रामटेके रा. आंबेडकरनगर, प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल ऊर्फ पीजी यांनी हल्ला केली. या पाच जणांनी प्रवीणला घेरून चाकूने वार केले. घटनेनंतर आरोपी पसार झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी जखमी प्रवीणला शासकीय रुग्णालयात दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्रीच यातील आरोपी साहील संजय रामटेके याला अटक केली. तर दुसऱ्या दिवशी निखिल ऊर्फ पीजी गौरकर आणि वेदांत मानकर या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. हर्षल चचाने व प्रफुल्ल गजबे हे दोन आरोपी पसार आहेत. या प्रकरणी हरीश अरुण मुळे याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी हत्त्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; खुनाचे सत्र सुरूच
आठवडीबाजार परिसरातही बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांकडे कुणाचीही तक्रार आली नाही. ही घटनासुद्धा विसर्जन मिरवणूक वादातून घडल्याची चर्चा आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा काढण्याचे प्रकार वाढले आहे. शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. आर्णी मार्गावरही वाद झाल्याची चर्चा शहरात आहे. तेही प्रकरण पोलिसांकडे आले नाही. यावरून भविष्यात आणखी भीषण घटना घडण्याची शक्यता गुन्हेगारी वर्तुळात वर्तविली जात आहे.

आठवडीबाजारातही हल्ला
यवतमाळ येथील आठवडी बाजार परिसरात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता धक्का लागल्यावरून वाद घालत एकाने धारदार चाकूने वार केले. यात आकाश गौतम शिरसाट (रा. फुकटनगर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून राजू किसन वाघाडे (रा. पाटीपुरा) याच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Web Title: Youth killed in immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.