तरुणाने घेतली खुनी नदीत उडी, शर्टावर लिहिली पत्नी व त्रास देणाऱ्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 09:12 PM2018-07-11T21:12:21+5:302018-07-11T21:12:32+5:30

पांढरकवडा तालुक्यातील आकोली (खु.) येथील एका तरुणाने खुनी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

The youth took the boat in the river Khuni, the wife written on the shirt and the troubleshooters | तरुणाने घेतली खुनी नदीत उडी, शर्टावर लिहिली पत्नी व त्रास देणाऱ्यांची नावे

तरुणाने घेतली खुनी नदीत उडी, शर्टावर लिहिली पत्नी व त्रास देणाऱ्यांची नावे

Next

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील आकोली (खु.) येथील एका तरुणाने खुनी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. प्रफुल्ल बंडू कुरमेलकर असे तरुणाचे नाव आहे. उडी घेण्यापूर्वी त्याने त्याच्या शर्टावर पत्नी व इतर लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे लिहून ठेवल्याचे आढळून आले. सलूनचा व्यवसाय करणा-या या तरुणाचे घरगुती कारणावरून त्याचे नेहमीच वाद व्हायचे. बुधवारी ५ वाजताच्या सुमारास तो स्मशानभूमीजवळून नदीवर गेला व त्याने नदीत उडी घेतली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके हे त्यांच्या सहका-यांसह घटनास्थळावर पोहोचले. तहसीलदार महादेव जोरवर यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: The youth took the boat in the river Khuni, the wife written on the shirt and the troubleshooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.