झापरवाडी ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:26 AM2018-03-24T00:26:44+5:302018-03-24T00:26:44+5:30
जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील टोकावरील झापरवाडी येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे.
ऑनलाईन लोकमत
आर्णी : जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील टोकावरील झापरवाडी येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी ते बंद पाडले.
झापरवाडी येथील रस्त्याचे काम पुसद येथील कंत्राटदाराने २० टक्के कमी दराची निविदा भरून घेतले आहे. कंत्राटदाराने गावात कामाला सुरूवात केली. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना तक्रार देऊन काम बंद करण्याची मागणी केली. पूर्ण साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरु करु नये, अन्यथा जनआंदोलन ऊभारू, असा ईशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. मात्र जेमतेम २०० मीटरचे काम होताच गावकऱ्यांनी ते बंद पाडले. मात्र वरिष्ठ अधिकाºयांनी अद्याप झापरवडीला भेट दिली नाही. झापरवाडी हे माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम यांचे गाव आहे. विद्यमान सदस्य प्रकाश राठोड हे सुद्धा याच भागातील आहे. गावकºयांनी त्यांच्याकडेही तक्रार केली. त्यांनी काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली.
या रस्त्याबाबत गावकºयांची तक्रार आल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णीचे उपअभियंता भेंडे यांनी सांगितले. मात्र त्यावर काय कारवाई झाली, याबाबत ते काहीही सांगू शकले नाही.
लोकप्रतिनिधी, प्रशासन प्रचंड उदासीन
जिल्हा परिषदेच्या रस्त्यांबाबत नेहमीच ओरड होते. पुसद, उमरखेड भागात तर एकाच रस्त्यावर दोनदा काम करण्यात आल्याचे उघड झाले. चांगल्या रस्त्यावर दुसºयांदा काम दर्शवून लाखोंचा मलीदा लाटला गेल्याचेही दिसून आले. तरीही लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन आहे. कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असताना त्यांना कुणीही आडकाठी आणताना दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदारांची हिम्मत वाढत आहे. अखेर गावकºयांनाच पुढाकार घेऊन अशी कामे थांबवावी लागतात. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे कंत्राटदारांशी लागेबांधे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.