तलवारीने ‘बर्थ डे केक’ कापणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:09 PM2018-08-10T22:09:30+5:302018-08-10T22:10:28+5:30

आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती.

Zardari gang of 'Birthday cake' by the sword | तलवारीने ‘बर्थ डे केक’ कापणारी टोळी जेरबंद

तलवारीने ‘बर्थ डे केक’ कापणारी टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्देयवतमाळात गँगवॉर टळले : टोळीविरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती. यासाठी जमवलेल्या शस्त्रसाठ्यातील तलवारीने गुरूवारी रात्री एकाने केक कापत ‘बर्थ डे सेलिब्रेट’ केला. याची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने तिघांना अटक केली.
अश्विन सुनील यादव (२२), विजय लक्ष्मीकांत मस्त (२२), विकास गणपतराव इंगळे (२०) सर्व रा. तारपुरा यांना टोळी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून धारदार तलवार, कोयता आणि चायनीज चाकू जप्त केला. अश्विन हा रौनक यादव गटाचा सक्रीय सदस्य आहे. नुकतीच बाबा पवार समर्थक व रौनक यादव यांच्यात सशस्त्र झडप झाली होती.
अश्विनवर पवार टोळीतील असलमने हल्ला केला होता. यातून बरे होताच त्याने बदला घेण्यासाठी शस्त्रसाठा जमा केला. असलम हा कारागृहातून जामिनावर बाहेर येताच त्याचा गेम करण्याच्या तयारी होती. गुरूवारी अश्विनचा वाढदिवस होता. त्याने कारच्या बॉनेटवर केक ठेवून तलवारीने कापला. ही टोळी शहरात फिरत होती. याची माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी सापळा रचून शस्त्रासह तिघांना ताब्यात घेतले.
यादव टोळीच्या दहशतीमुळे बाब्या पवार याने यवतमाळ शहर सोडले. तर त्याचे समर्थक कारागृहात आहेत. आता यादव टोळीतील उरल्यासुरल्या सदस्यांचीही कारागृहात रवानगी झाली आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, अमोल चौधरी, विनोद राठोड, किरण श्रीरामे, जयंत शेंडे, राजकुमार कांबळे, श्रीधर शेंडे, आकाश सहारे, शशिकांत चांदेकर, गौरव ठाकरे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे यांनी केली.

Web Title: Zardari gang of 'Birthday cake' by the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.