Zero Shadow Day; वक्त इन्सान पे ऐसा भी कभी आता है... राह में छोड के साया भी चला जाता है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 PM2021-05-22T16:12:22+5:302021-05-22T16:12:44+5:30
सगेसोयरे सोडून गेले तरी माणसाची सावली सतत त्याच्यासोबत असते; पण शनिवारचा दिवस त्यालाही अपवाद ठरला. शनिवारी भरदुपारी यवतमाळकरांना त्यांची स्वत:चीच सावली सोडून गेली...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सगेसोयरे सोडून गेले तरी माणसाची सावली सतत त्याच्यासोबत असते; पण शनिवारचा दिवस त्यालाही अपवाद ठरला. शनिवारी भरदुपारी यवतमाळकरांना त्यांची स्वत:चीच सावली सोडून गेली...
मात्र कोरोनामुळे वाईट दिवस आले म्हणून काही सावली सोडून गेलेली नाही; तर ही होती एक खगोलीय घटना. दरवर्षीच मे महिन्यात सूर्य तळपत असताना असा प्रसंग ओढवतो. अशा दिवसाला ‘झिरो शॅडो डे’ किंवा ‘शून्य सावली दिवस’ असे म्हणतात. यंदा ही खगोलीय घटना महाराष्ट्रात ३ मे पासून ३१ मेपर्यंत विविध शहरांत दिसणार आहे.
२२ मे रोजी हा ‘शून्य सावली दिवस’ अनुभवण्याची संधी यवतमाळकरांना मिळाली. दुपारी १२ वाजता सूर्य जेव्हा डोक्यावर येतो, तेव्हा आपली सावली आपल्याच पायांशी घुटमळते; पण मे महिन्यात असा एक क्षण येतो, जेव्हा सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली पायांशी घुटमळण्याऐवजी ती आपल्या तळपायाखाली गडप होते. यवतमाळात शनिवारी दुपारी १२ वाजता हा अनुभव अनेकांनी घेतला. मात्र अधेमध्ये ढगाळी वातावरण झाल्याने अनेकांना आपली सावली गायब झाल्याचा पत्ताही लागला नाही.