जिल्हा परिषदेने टाळले ते ‘ईब्टा’ने साकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:23+5:30
यावर्षी जिल्हा परिषदेने शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरितच केले नाही. त्यामुळे जिल्ह्याची परंपरा खंडित झाली होती. मात्र इब्टा संघटनेने शिक्षकांना एकत्र आणून जिल्हा स्तरीय पुरस्काराचा सोहळा पार पाडून ही परंपरा अखंड राखली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी जिल्हा परिषदेने शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरितच केले नाही. त्यामुळे जिल्ह्याची परंपरा खंडित झाली होती. मात्र इब्टा संघटनेने शिक्षकांना एकत्र आणून जिल्हा स्तरीय पुरस्काराचा सोहळा पार पाडून ही परंपरा अखंड राखली.
रविवारी इब्टा शिक्षक संघटनेच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. यावेळी संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची सभाही पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईब्टाचे राज्य संघटक गजानन गायकवाड होते. प्रमुख अतिथी वाशिम जिल्हाध्यक्ष दीपक जावडे होते. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत, चंद्रकांत सुके, जगदीश आरमुरवार, अभय भुजाडे, गजानन हागे, अनिताताताई वऱ्हाडे, क्रांतीताई राऊत, मोडक, संतोष किनाके, प्रवीण ठाकरे, सचिन तंबाखे, निवास रामटेके, सुरेश काटेखाये, विकास मेशेवार, पारीसे व इतर शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक दिवाकर राऊत यांनी केले. सूत्रसंचालन हेमराज कळंबे यांनी तर संतोष किनाके यांनी आभार मानले.
या शिक्षकांना मिळाला पुरस्कार
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार वणी निलेश सपाटे, प्रवीण मेश्राम, झरी विनोद बलकी, अमर मडावी, मारेगाव हेमराज कळंबे, पांढरकवडा प्रभाकर उताणे, घाटंजी विनोद ढाले, कळंब संदीप कोल्हे, आर्णी प्रशांत वंजारे, नेर गजेंद्र धर्माळे, दारव्हा संदीप मिरासे, दिग्रस आमीन चव्हाण, पुसद जगदीश जाधव, महागाव आकाश गुजरकर, उमरखेड शफी शेख, राळेगाव विजय ढाले यांना प्रदान करण्यात आला. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिल्हा पुरस्कार यवतमाळ रेखा पोयाम, बाभूळगाव लता वानखेडे यांना देण्यात आला. तर मारेगावचे केंद्र प्रमुख प्रदीप रामटेके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.