जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 09:50 PM2017-09-12T21:50:09+5:302017-09-12T21:50:09+5:30

हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे.

In Zilla Parishad, learning from the school can be successful | जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

Next
ठळक मुद्देराजेश देशमुख यांची यशोगाथा : सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी!

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे. कोणती हेल्पलाईन वगैरे आपण जाहीर करणार नाही. पण सर्वांसाठी मी सहज उपलब्ध राहील. आज संपर्काची वेगवेगळी साधने आहेत, जनतेने कुठल्याही साधनाद्वारे माझ्याशी संपर्क साधला तरी मी भेटेल, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोकाभिमुख कार्यशैलीची इच्छा बोलून दाखविली.
जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.
प्रामाणिक परिश्रम हाच यशाचा मंत्र
ते म्हणाले, देवळालीच्या (जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद शाळेतच माझे शिक्षण झाले. आई कुसूम नगरपरिषदेच्या तर वडील भागवतराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही मुंबईसारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षा कोणत्याही भाषेतून देता येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत मुलगा शिकला म्हणजे, तो मागे पडेल, असा समज ठेवू नये. प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम केले तर यश मिळतेच.
शाळांचे यश लोकांपर्यंत पोहोचवा
सातारामध्ये सीईओ असताना आम्ही डिजिटल व्हॅन तयार केली. त्यात ५० उत्तम शाळांचे प्रेझेंटेशन केले आणि ही व्हॅन गावोगावी फिरविली. यवतमाळ जिल्ह्यातही चांगले प्रयत्न सुरू आहेत. फक्त जिल्हा परिषद शाळांची यशोगाथा घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे डॉ. राजेश देशमुख म्हणाले.
प्रशासन आणि वैयक्तिक जीवन ही कसरतच एकाच वेळी प्रशासन आणि कौटुंबिक जबाबदाºया पार पाडणे ही कसरतच असते. आताच माझ्या वडिलांचे कॅन्सरचे आॅपरेशन झाले. पत्नी विजया घरातील जबाबदाºया सक्षमपणे हाताळते. त्यामुळे मला प्रशासकीय जबाबदाºयांवर ‘फोकस’ ठेवणे शक्य होते. मुलगी आर्या आणि मुलगा आदित्य शिक्षणात हुशार आहेत, असे ते म्हणाले.
१८ कॅन्सरग्रस्तांना दिले जीवदान
सातारा येथे सीईओ म्हणून काम करताना डॉ. राजेश देशमुख यांनी कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी प्रभावी काम केले. त्याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, हा माझ्या कामाचा भाग नव्हता, पण जबाबदारी म्हणून आम्ही ते केले. अमेरिकेत असलेला आणि सध्या मुंबईत असलेल्या एका मित्रामुळे मला या कामात योगदान देता आले. तो मित्र आणि मी मुंबईत झालेल्या कर्करोग संशोधकांच्या जागतिक परिषदेत गेलो होतो. पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील कॅन्सर १०० नव्हे २०० टक्के बरा होतो, हे आम्हाला कळले. पण दुर्दैव म्हणजे, एखाद्याला कॅन्सर झाला हे जेव्हा कळते, तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. ही बाब टाळून रूग्णांना वाचविण्यासाठी आम्ही ‘कॅन्सर साक्षर सातारा’ हा उपक्रम राबविला. साताºयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, एएनएम यांना खास प्रशिक्षण दिले. गावकºयांशी संपर्क वाढविण्यास सांगितले. कुणामध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे दिसतात का हे शोधायला लावले. अशा संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार देण्यासाठी शंभराहून अधिक शिबिरे घेतली. २०० हून अधिक रूग्ण ‘सस्पेक्टेड’ आढळले. गरजू रूग्णांना साताºयाच्या दोन विशेष रूग्णालयात आणून उपचार केले. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाखांचा निधी वेगळा ठेवला. १८ रूग्णांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या सर्वांना वाचविण्यात आम्हाला यश आले.
 

Web Title: In Zilla Parishad, learning from the school can be successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.