सुनावणीसाठी जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:22 PM2018-07-14T22:22:34+5:302018-07-14T22:24:23+5:30

आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते.

Zilla Parishad teacher's school for hearing | सुनावणीसाठी जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

सुनावणीसाठी जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

Next
ठळक मुद्देसीईओंपुढे पेशी : कागदपत्रे खरी असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते.
आॅनलाईन प्रक्रियेत जिल्ह्यातील पाच हजारांच्या आसपास शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये संवर्ग एक आणि दोनमधील अनेक शिक्षकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याची ओरड सुरू झाली. जिल्हा परिषदेकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी अशा ११५ शिक्षकांची सुनावणी घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी या सर्व शिक्षकांना शनिवारी जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सीईओंनी क्रमाने शिक्षकांना पाचारण करून त्यांचे मत ऐकून घेतले. यावेळी अनेक शिक्षकांनी आपली कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचा दावा केला.
बदलीपात्र शिक्षकांनी यापूर्वीच आपली कागदपत्रे गटशिक्षणाधिकाºयांकडे सादर केली होती. त्यांनी छाननी केल्यानंतर ती शिक्षणाधिकारी कार्यालयात पोहोचली. तेथेही कागदपत्रांची तपासणी केली. ईओंच्या सूचनेनुसारच शिक्षकांनी एसटी महामंडळाकडून ३० किलोमीटरचे प्रमाणपत्र प्राप्त केले. मात्र ईओंनी नव्याने आदेश काढून ते प्रमाणपत्र ग्राह्य नसल्याचे स्पष्ट केले होते. यात आमची काय चूक, असा प्रश्न या शिक्षकांनी उपस्थित केला.
कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांची तपासणी झाली. त्या तपासणीत वरिष्ठ अधिकाºयांनी चूक अथवा त्रुटी का काढली नाही, असा प्रश्नही या शिक्षकांनी उपस्थित केला. आता आमच्यावर कारवाई होणार असेल तर संबंधित वरिष्ठ अधिकाºयांवरही कारवाई करावी, असा मुद्दा या शिक्षकांनी सीईओंपुढे रेटला. आता सीईओ या प्रकरणी कोणती कारवाई करतात, याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Zilla Parishad teacher's school for hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.