जिल्हा परिषद टाकणार तीन कोटींचे नालाबांध

By admin | Published: May 29, 2016 02:38 AM2016-05-29T02:38:58+5:302016-05-29T02:38:58+5:30

जलसंवर्धनासाठी सर्व शासकीय यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही पावसाचे पाणी अडविण्यासाठी सिमेंट नालाबांध प्रस्तावित केले आहे.

Zilla Parishad will put up three crores of Nallabandha | जिल्हा परिषद टाकणार तीन कोटींचे नालाबांध

जिल्हा परिषद टाकणार तीन कोटींचे नालाबांध

Next

सिंचनचा आराखडा : सर्वाधिक सिमेंट बांध होणार घाटंजी तालुक्यात
यवतमाळ : जलसंवर्धनासाठी सर्व शासकीय यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही पावसाचे पाणी अडविण्यासाठी सिमेंट नालाबांध प्रस्तावित केले आहे. त्यासाठी २ कोटी ८७ लाख ४ हजार ९७० रुपये इतका निधी लागणार आहे. जिल्हाभरात २० बंधारे टाकण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
सिंचन विभागाने सर्व्हे करून सिमेंट नालाबांध कुठे टाकता येईल याची यादी केली आहे. यानुसार त्याला किती खर्च येणार याचीही माहिती सर्व्हेक्षण अहवालातून देण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील भूजल पातळी २.४५ मीटरने खालावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार आहे. अशा स्थितीत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा हमखास पर्याय म्हणून सिंमेट नालाबांधाकडे पाहण्यात येते. त्यानुषंगाने नियोजन करण्यात आले आहेत.
यवतमाळ तालुक्यातील जांंब, लोणी, टेंभुर्णी, पुसद तालुक्यातील येलदरी, आर्णी तालुक्यातील कापेश्वर, वरूड, झरी तालुक्यातील कमळवेली, डोंगरगाव, कळंब तालुक्यातील नरसापूर, मेंढला, केळापूर तालुक्यातील रामपूर, बग्गी, पहापळ, घाटंजी तालुक्यातील घोटी, घोटी प्रेमनगर, राजूरवाडी, पारवा, मारेगाव तालुक्यातील धामणी, रोहपट, उमरखेड तालुक्यातील पिंपळदी येथे सिंमेट नालाबांध प्रस्तावित आहेत. आता निधी उपलब्ध होताच सिंचन विभागाकडून प्रस्तावित कामाला मूर्तरूप दिले जाणार आहे. सिंमेट नालाबांध कमी खर्चात भक्कम पर्याय म्हणून जलसंधारणात महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सिंचन विभागाचे नियोजन सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad will put up three crores of Nallabandha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.