झुंबा करा अन् वजन घटवा !

By admin | Published: February 11, 2017 12:14 AM2017-02-11T00:14:58+5:302017-02-11T00:14:58+5:30

घरकाम आणि व्यस्त दिनचर्येमुळे अनेक जण जीममध्ये जाऊ शकत नाही. त्यांच्या आहारातही अनियमितता येऊन शरीरात स्थूलता वाढते.

Zumba and lose weight! | झुंबा करा अन् वजन घटवा !

झुंबा करा अन् वजन घटवा !

Next

सखी मंचतर्फे खास कार्यशाळा : ईशा डांग शिकविणार फिटनेसचे तंत्र
यवतमाळ : घरकाम आणि व्यस्त दिनचर्येमुळे अनेक जण जीममध्ये जाऊ शकत नाही. त्यांच्या आहारातही अनियमितता येऊन शरीरात स्थूलता वाढते. आता यवतमाळात प्रथमच ‘झुंबा वर्कशॉप’च्या माध्यमातून शरीराची निगा राखण्याची संधी आली आहे. काहीसा नृत्यशैलीकडे झुकणारा हा व्यायामाचा प्रकार आहे. असा हा आगळावेगळा झुंबा शिकविण्यासाठी सखी मंचतर्फे येत्या १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत ईशा डांग यांची कार्यशाळा होणार आहे.
‘डान्सफिट’ संस्थेच्या माध्यमातून लोकमत सखी मंचतर्फे ही कार्यशाळा आयोजित आहे. ईशा डांग या डान्सफिट संस्थेच्या संस्थापक आहेत. मान्यताप्राप्त झुंबा व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यासोबतच ‘बोक्वा’ आणि ‘बॉली भांगडा’ या प्रकारातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावला आहे. सुदृढ आरोग्य आणि पूरक आहार याबाबत त्यांनी प्रशिक्षकही तयार केले आहेत. त्यांनी पूर्ण राज्यात विविध ठिकाणी त्यांचे झुंबा क्लासेस झालेले आहेत. लोकमत सखी मंचच्या माध्यमातून ईशा डांग आता यवतमाळात झुंबा हा फिटनेसचा मंत्र शिकविणार आहेत.
कार्यशाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एकंदरच शारीरिक तंदुरुस्तीबद्दल प्राथमिक मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासोबतच झुंबाची माहिती दिली जाईल. ईशा डांग यांचा मास्टर क्लास होईल. बेसिक अ‍ॅब्स ट्रेनिंग, हेवी कार्डिओ, यासोबतच आहारविषयक माहिती दिली जाईल. तिसऱ्या दिवशी सर्किट ट्रेनिंग, घरी करायचे ‘वर्कआउट’, झुंबा अ‍ॅडव्हान्स हे प्रकार शिकविले जाणार आहे. क्रॉसफिट, टबाटा, फंक्शनल फिटनेस, सर्किट ट्रेनिंग, मॅट पिलेट्स, पॉवर योगा, प्लिओमेट्रिक्स, कॅलिस्थेनिक्स असे विविध व्यायामप्रकारही या कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत.
प्रकल्प अधिकारी म्हणून अलका राऊत (९९२२६६१४८७), विद्या बेहरे (९५४५९८२५५३), किरण इंगळे (८८८८०७७७२७), छाया राठी (९४२०६२२७९९), वर्षा बेलसरे (९८६०४६६२१६), शुभदा हातगावकर (९८९०७७९४३४), स्मिता गंधे (८८८८४८४५७०), सोनल देशमुख (८६६८९७१३४६) या काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी व वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.(उपक्रम प्रतिनिधी)

असे असेल तीन दिवसीय प्रशिक्षण
झुंबा प्रशिक्षणासाठी वुडन फ्लोअरची आवश्यकता असल्याने यवतमाळातील दारव्हा रोडस्थित हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाच्या जवाहरलाल दर्डा इन्डोअर स्टेडियममध्ये (पी-१० एमआयडीसी, ओरिएन्ट सिन्टेक्सच्या बाजूला) हे तीन दिवसीय झुंबा वर्कशॉप होणार आहे. दररोज पाच बॅचेसमध्ये प्रशिक्षण होणार असून प्रत्येक बॅच दीड तासांची असेल. सकाळी ७.३० ते ९ आणि ९ ते १०.३० अशा दोन बॅचेस होतील. तर दुपारी ३.३० ते ५, सायंकाळी ५ ते ६.३० आणि सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत तीन बॅचेस होणार आहेत. या वर्कशॉपमध्ये महिला, मुले, मुली सहभागी होऊ शकतील. सखी मंचच्या सदस्यांकरिता व त्यांच्या मुला-मुलींकरिता प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आहे. सखी मंचच्या सदस्य नसलेल्या महिला व मुला-मुलींसाठी प्रत्येकी ६०० रुपये शुल्क आहे. महिला, मुले, मुली एका बॅचमध्ये असू शकतील. कोणत्याही एका बॅचमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. वर्कशॉपच्या ठिकाणी सखी मंचची सदस्य नोंदणी सुरू राहील. नॉर्मल कॉटन टि शर्ट, जिन्स पँट, फ्रँक पँट, सलवार सुट, शूज असा ड्रेसकोड राहील. वर्कशॉपसाठी येताना पिण्याचे पाणी आणि नॅपकीन सोबत अवश्य घेऊन यावे.
 

Web Title: Zumba and lose weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.