ह्या आठवड्यात एक पाऊल मागे जाऊन दोन पाऊले पुढे जाण्याची संधी संभवत असल्याने आपण कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये. ह्या आठवड्यात आपण जर आपली ऊर्जा व वेळ योग्य दिशेत नेलेत तर आपल्या कार्यात निश्चितच यशस्वी होऊ शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनाने आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायात आपण अपेक्षित लाभ मिळवू शकाल. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. महिलांचा बहुतांश वेळ पूजा - पाठ किंवा धार्मिक प्रवृत्तीत व्यतीत होईल. प्रेम संबंध प्रगल्ल्भ होतील. आपणास प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच आहे.