हा आठवडा आपणास सुख, शांती व लाभ देणारा आहे. आपल्या प्रलंबित कामांना मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपला व्यवसाय, विस्तार योजनेसह प्रगती करेल. आठवड्याच्या उत्तरार्धात सुख - सोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना आपणास खिश्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्री आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. आई - वडिलांचे सहकार्य व सौख्य प्राप्त होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य होण्याची संभावना आहे. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने सामान्यतः चांगला आहे. प्रणयी जीवनातील गैरसमज दूर होऊन नात्यात माधुर्य निर्माण होईल. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकाल. आठवड्याच्या अखेर पर्यंत संतती कडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.