Lokmat Astrology

दिनांक : 01-Nov-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

हे नवीन वर्ष आपणास खूप चांगले परिणाम मिळवून देणारे आहे. आपल्या खोळंबलेल्या योजनांना गती येईल. आपण आपल्या व्यावसायिक प्रवृत्तींना पुढे घेऊन जाण्यात सुद्धा यशस्वी व्हाल. आपणास जर व्यापारवृद्धी करावयाची असेल तर ह्या वर्षी आपण त्यात यशस्वी व्हाल. ह्या वर्षी आपणास अचानक मोठा धनलाभ होण्याची संभावना आहे. आपले आरोग्य सुद्धा उत्तम राहील. परंतु, वर्षाच्या सुरवातीस प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. ह्या वर्षी आपसातील समन्वय बिघडून कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने आपणास आपल्या कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. व्यापारा निमित्त अनेकदा परदेशवारी करावी लागू शकते. उच्च शिक्षणासाठी सुद्धा हे वर्ष अनुकूल आहे. ह्या वर्षी आपली उन्नती होईल. हळू - हळू जीवनातील सर्व क्षेत्रात आपण उन्नती कराल व वर्षाच्या मध्या पर्यंत आपण अत्यंत चांगल्या स्थितीत याल. जस - जसे हे वर्ष पुढे सरकेल तस - तसे आपल्याला खूप काही प्राप्त होत असल्याचे आपणास वाटू लागेल. त्यामुळे आपण खुश व्हाल व आपला आत्मविश्वास उंचावेल. आपण जर एखादे एनजीओ चालवत असाल किंवा एखाद्या संस्थेची फ्रेचाईजी घेऊन काम करत असाल तर ह्या वर्षी आपण त्यात खूपच यशस्वी व्हाल. आपण नाव सुद्धा कमवाल व आपल्या कामात वाढ सुद्धा होईल. त्यामुळे आपणास चांगली अर्थप्राप्ती सुद्धा होईल. आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक उपलब्धी सुद्धा प्राप्त करू शकाल. गर्भवती महिलांना वर्षाच्या सुरवातीस थोडी काळजी घ्यावी लागेल. पोटात उष्णता वाढून रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या सुद्धा उत्तम प्रकारे पार पाडाल. ह्या संपूर्ण वर्षात आपणास सूर्यदेवतेची आराधना करावी लागेल. असे केल्याने आपण शक्तिशाली होऊन आजारी पडण्या पासून चार हात लांब राहू शकाल. ह्या वर्षात आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असताना आपणास आपल्या मित्रांना सुद्धा मदत करावी लागेल. वर्षाच्या सुरवातीस आपण घराचे नूतनीकरण करू शकता. माता - पिता आपल्या पाठीशी उभे राहतील. त्यांच्या आशीर्वादाने आपली सर्व कामे होतील. आपणास नशिबाची साथ सुद्धा मिळेल व त्यामुळे वर्षाच्या सुरवातीस आपण जे काम मनापासून करू इच्छित असाल त्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल. आपली सामाजिक प्रतिमा प्रबळ होऊन सामाजिक वर्तुळ सुद्धा वाढेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यास एप्रिल नंतरचे दिवस जास्त अनुकूल आहेत. आपली जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर मार्च ते ऑक्टोबर दरम्यान आपण त्यात यशस्वी होऊ शकाल.

राशी भविष्य

31-10-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण चतुर्दशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 09:28 to 10:53

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:36 to 11:24 & 15:24 to 16:12

राहूकाळ : 13:45 to 15:11