Lokmat Astrology

दिनांक : 01-Nov-24

राशी भविष्य

 तूळ

तूळ

तूळ राशीच्या व्यक्ती जीवनात समतोलास महत्व देणारे व महत्वाकांक्षी असतात. ह्या वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या महत्वाकांक्षाची पूर्तता करण्यास प्राधान्य द्याल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा आपण पुन्हा प्राप्त कराल. त्यामुळे आपण जीवनाकडे वेगळ्या नजरेने बघण्यास सुरवात कराल. असे केल्याने जीवनास नावीन्य प्राप्त होऊन आपणास यश प्राप्ती सुद्धा होईल. वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या वाणीने व व्यवहाराने लोकांना आपल्याकडे ओढण्यात यशस्वी व्हाल, व त्यामुळे आपली सर्व कामे होताना दिसतील. व्यापार असो किंवा नोकरी किंवा स्वयं रोजगार, सर्व क्षेत्रात आपला दबदबा राहील. कुटुंबात सुद्धा आपली प्रतिष्ठा चांगलीच राहील. आपले धाडस वाढेल व त्यामुळे आपण व्यापारात जोखीम घ्याल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपल्यासाठी उन्नतीचे मार्ग मोकळे होत असल्याचे दिसून येईल. भावंडांच्या बाबतीत काही समस्या समोर येऊ शकतात. परंतु आपण आपले सामंजस्य दाखवून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून येईल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे प्रेम मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने आपली कामे होतील. परदेशवारीची तयारी करत असलेल्या जातकांना सुरवातीस काही अडचणींचा सामना करावा लागेल. कदाचित त्यांचा व्हिसा मिळण्यात विलंब होऊ शकतो, परंतु निराश होऊ नका. कारण काही अडचणी व काही औपचारिकता पूर्ण केल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांना व्हिसा मिळू शकतो. ह्या वर्षी आपले खर्च जास्त होतील. खर्च इतके कसे वाढले हे आपणास समजणार सुद्धा नाही. आपणास सर्व खर्च योग्य असल्याचे वाटेल व त्यामुळे अनावश्यक रूपात पैसे खर्च होतील. ह्या व्यतिरिक्त धनलाभाची सुद्धा संधी मिळेल व त्यामुळे आपण बँकेतील शिल्लक वाढविण्यासाठी व बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसे पाहू गेल्यास ह्या वर्षी आपणास आर्थिक आघाडीवर उत्तम यश प्राप्त होऊ शकते. प्रेम संबंध सांभाळण्याचे आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकते. परंतु, आपण जर आव्हाने स्वीकारलीत व जीवनात समतोलास प्राधान्य दिले तर प्रणयी जीवनात सर्व काही मिळू शकेल. वैवाहिक जीवनात सुखद बातमी मिळेल. मुलांकडून सुद्धा आपणास ख़ुशी प्राप्त होईल. ह्या वर्षी आपणास मातुल घराण्याशी संभाव्य वादास सामोरे जावे लागू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. प्रॉपर्टीच्या खरेदी - विक्रीतून लाभ होईल. वर्षाच्या मध्यास आपणास नशिबाची साथ मिळेल व वर्षाच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंत चांगला आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे.

राशी भविष्य

31-10-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण चतुर्दशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 09:28 to 10:53

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:36 to 11:24 & 15:24 to 16:12

राहूकाळ : 13:45 to 15:11